आयएमआर कॉलेजमध्ये १८ वर्षांवरील विद्यार्थ्यांचे लसीकरण

नोव्हेंबर 23, 2021 4:14 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । २३ नोव्हेंबर २०२१ । जळगाव येथील खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटीच्या इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च महाविद्यालयात १८ वर्षावरील विद्यार्थ्यांसाठी लसीकरण मोहीमेचे आयोजन करण्यात आले होते.

IMR jpg webp

महाविद्यालयाचा विदयार्थी विकास विभाग आणि छत्रपती शाहू महाराज रुग्णायलाय यांच्या संयुक्त विद्यमाने या मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. संचालिका प्रा.डॉ. शिल्पा बेंडाळे यांच्या हस्ते या मोहिमेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी त्यांनी १८ वर्षावरील सर्व विद्यार्थ्यांनी या लसीकरण मोहिमेचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले. विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी या लसीकरण मोहिमेत उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदविला. लसीकरण झालेल्या विदयार्थ्यांना त्वरित प्रमाणपत्र देखील देण्यात आले.

कार्यक्रमास छत्रपती शाहू महाराज रुग्णायलातील आरोग्यसेवक साधना चव्हाण, मयूर इंगळे, प्रा.तनुजा फेगडे, प्रा.नीलिमा पाटील, प्रा.दिपाली पाटील, प्रा.स्वप्नील काटे, प्रा.संदीप घोडके, सयाजी जाधव, वेदांत दुसाने, अक्षद बेंद्रे, संस्कृती नेवे, उमेश देशमुख आदींचे सहकार्य लाभले.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now