..तर राजकारणातून संन्यास घेणार : एकनाथराव खडसे

नोव्हेंबर 17, 2021 10:30 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । १७ नोव्हेंबर २०२१ । बँकेच्या बाबतीत चौकशी म्हणजे आपला छळ सुरू आहे. जिल्हा बँकेत देखील भ्रष्टाचाराचे आरोप झाले. जिल्हा बँकेची ईडीची चौकशी लावावी जर त्यात एक रुपयाचा जरी भ्रष्टाचार सापडला तर आपण राजकारणातून संन्यास घेऊ, असे खुले आव्हान माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी दिले आहे.

eknath khadse

जळगाव शहरातील लेवा भवनमध्ये आयोजित सहकार पॅनलच्या मेळाव्यात ते बोलत होते. एकनाथराव खडसे पुढे म्हणाले, जिल्हा बँकेच्या अध्यक्षा रोहिणी खडसे यांनी 500 कोटींचे कर्ज विविध कंपन्यांना देऊन हा पैसा आपल्या खात्यावर वळवला असा एका नामांकित वृत्तपत्रात आरोप करण्यात आला आहे. मात्र हे सर्व नाट्य रंगवून आपली छळवणूक करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप एकनाथराव खडसे यांनी केला आहे. यासोबत त्यांनी माझी ईडीचं नाही तर इतर कोणत्याही खात्यामार्फत चौकशी करायची असेल तर करा, असे थेट आवाहन एकनाथराव खडसे यांनी विरोधकांना दिले आहे.

विरोधकांनी जिल्हा बँक शेतकऱ्यांची असल्याने बँकेत शेतकरी पाहिजे असे म्हटले आहे. मात्र मी स्वतः शेती करणारा आहे. पण विरोधकांची शेती म्हणजे ‘ नाचता येईना अंगण वाकडे’ अशी स्थिती असल्याची टीका करत खडसेंनी माजी मंत्री गिरीश महाजन यांच्यावर निशाणा साधला. गेल्या पाच वर्षात जिल्हा बँक अत्यंत सुस्थित आणली आहे. देशातील दहा बँकात जिल्हा बँकेचा क्रमांक आहे. जिल्हा बँकेला ५६ कोटी रुपयांचा नफा झाला आहे. आगामी काळात बँक शेतकऱ्यांच्या अधिक हितासाठी काम करेल त्यासाठी सहकार पॅनलच्या उमेदवारांना विजयी करावे असे आवाहन खडसे यांनी केले.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now