भाजप अल्पसंख्यांक युवा मोर्चा महानगर जिल्हाध्यक्षपदी अश्फाक शेख
जळगाव लाईव्ह न्यूज । १७ नोव्हेंबर २०२१ । भारतीय जनता पार्टीच्या अल्पसंख्याक युवा मोर्चाच्या महानगर जिल्हाध्यक्षपदी अश्फाक फाउंडेशनचे अध्यक्ष अश्फाक मुनाफ शेख यांची निवड करण्यात आली आहे. महानगर जिल्हाध्यक्ष दीपक सुर्यवंशी यांनी ही नियुक्ती केली.
अश्फाक शेख यांना माजी जलसंपदामंत्री आ.गिरिश महाजन, ग्रामीण जिल्हाध्यक्ष आ.सुरेश भोळे, महानगर जिल्हाध्यक्ष दीपक सुर्यवंशी यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले. यावेळी अश्फाक शेख यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अल्पसंख्यांक समाज व युवकासाठी सुरु असलेल्या उपक्रमात महत्वपूर्ण भूमिका निभावून जास्तीत जास्त युवकांना त्यांच्या कार्यात सहभागी करू, असा विश्वास व्यक्त केला आहे.
अश्फाक शेख यांच्या निवडीबद्दल अल्पसंख्यांक आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष शैबाज शेख, महानगर जिल्हा अल्पसंख्यांक आघाडीचे अध्यक्ष साबीर गुड्डू पठाण, मंडल अध्यक्ष अजित राणे, विनोद मराठे, परेश जगताप, नगरसेवक मुकुंदा सोनवणे, नगरसेवक सुरेश सोनवणे, प्रभाग समिती सदस्य मनोज भांडारकर, युवा मोर्चा अध्यक्ष आनंद सपकाळे, शाईद शेख आदींनी अभिनंदन केले आहे.