⁠ 
शुक्रवार, जून 14, 2024

.. तर तुमची गॅस सिलिंडरवर मिळणारी सबसिडीही बंद होईल ; आजच हे काम करा

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २८ मे २०२४ । केंद्र सरकारने सर्व एलपीजी घरगुती गॅस कनेक्शनधारकांना तातडीने ई-केवायसी करण्याचे निर्देश दिले आहेत. ई-केवायसी पूर्णतः निशुल्क आहे. ई-केवायसी न केल्यास तुमच्या गॅसची रिफिलिंगसह मिळणारी सबसिडीही बंद होईल.

भारतीय पेट्रोलियम मंत्रालयाने याबाबत आदेश दिले आहेत. उज्ज्वला योजनेसह घरगुती ग्राहकांनी २०२२ नंतर गॅस कनेक्शन घेतले आहेत. त्यांना ई-केवायसी करावी लागणार आहे. ई-केवायसी करण्यासाठी कनेक्शन घेतलेल्या लाभार्थ्यांचा मोबाइल व आधारकार्ड सोबत असणे आवश्यक आहे. ई-केवायसी न केल्यास ग्राहकाचे गॅस सिलिंडर डिलिव्हरी व सबसिडी बंद होऊ शकते. एखाद्या ग्राहकासोबत असे झाल्यास तो संबंधित एजन्सीमध्ये जाऊन ई-केवायसी करून घ्यावी. त्यांचे कनेक्शन पुन्हा सुरू होईल.

ग्राहकांनी त्यांच्या गॅस कनेक्शनची सुरक्षा तपासणीही करून घेणे अनिवार्य आहे. तुमचा मोबाइल क्रमांक बदलला आहे. तो तत्काळ अपडेट होईल, कनेक्शनधारकाचा मृत्यू झाला असल्यास संबंधित कनेक्शन दुसऱ्याच्या नावावर करता येईल. गॅस कनेक्शनमध्ये इतर काही अडचणी असल्यास त्या दुरुस्त करता येतील. ग्राहक सरकारकडून मिळणाऱ्या सबसिडीचा लाभ घेऊ इच्छितात तर त्यांनी कनेक्शनमध्ये रजिस्टर मोबाइल क्रमांकावरूनच सिलिंडर रिफिलिंग बुकिंग करावी. बुकिंग केल्याशिवाय डिलिव्हरी करणाऱ्या व्यक्तींकडून सिलिंडर घेऊ नये. त्यामुळे लाभाथ्याँच्या सबसिडीचे नुकसान होऊ शकते असे येथील पुरवठा विभागाकडून सूचित करण्यात आले.