⁠ 
शुक्रवार, जून 14, 2024

भुसावळ दुहेरी हत्याकांड ! मुख्य सूत्रधाराने दिली खुनाची कबुली, हत्येमागील कारण काय?

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १ जून २०२४ । भुसावळ शहरातील दुहेरी हत्याकांडप्रकरणी आतापर्यंत तीन जणांना अटक करण्यात आली आहे. त्यातील नाशिक येथून अटक करण्यात आलेला मुख्य सूत्रधार करण पथरोड याने शुक्रवारी खुनाची कबुली दिली आहे. त्याच्याकडून दोन गावठी पिस्तूल व पाच जिवंत काडतुसे जप्त करण्यात आले आहेत. याशिवाय शिव पथरोड व संतोष बारसे यांच्यात साफसफाईच्या ठेक्यावरून धूसफूस सुरू होती, अशी माहिती मिळाली.

भुसावळ येथे मागील आठवड्यात पाण्याच्या टँकरवरून भांडण झाले होते. त्यावरून बुधवारी रात्री भाजपचे माजी नगरसेवक संतोष मोहन बारसे (४८) आणि सुनील राखुंडे (४५) या दोन जणांवर बेछूट गोळीबार करुन त्यांची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी १० ते ११ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.

यापैकी रिपाइंचा जिल्हाध्यक्ष राजू सूर्यवंशी व विनोद चावरिया या दोघांना गुरुवारी दुपारी साक्री येथून तर तिसरा संशयित करण किसन पथरोड (२०) यास नाशिक येथून अटक करण्यात आली. करण याच्याकडून दोन गावठी पिस्तूल व जिवंत काडतुसे जप्त करण्यात आले आहेत. करण याने खुनाची कबुली दिल्याची माहिती दिली.

जिल्ह्यातील एका मोठ्या हॉस्पिटलमधील साफसफाईचा ठेका या खूनप्रकरणातील एक संशयित आरोपी शिव पथरोड याच्याकडे होता. पथरोडकडील हा सफाईचा ठेका संतोष बारसे याने आपल्या जवळच्या मित्राला मिळवून दिला. त्यामुळे शिव याचा बारसेवर राग होता. हा ठेका काढून घेतल्याची एक किनारही या खुनामागे असल्याची माहिती मिळाली.