चाळीसगावात महावितरणने केली ६८ वीजचोरांवर कारवाई
जळगाव लाईव्ह न्यूज । १७ नोव्हेंबर २०२१ । महावितरणच्या चाळीसगाव शहर उपविभागीय कार्यालयाने मोहीम राबवून ६८ वीजचोरांवर कारवाई केली आहे. ऑक्टोबर महिन्यात ही मोहीम राबविण्यात आली होती.
महावितरणच्या शहर उपविभागीय कार्यालयाने मोहीम राबवून जवळपास ४५ ग्राहकांवर कारवाई करून ७३,०२८ युनिटचे ग्राहकांकडून १२ लाख ७७ हजार ७८७ रुपये भरून घेतले आहेत. तसेच वीजचोरीला आळा घालण्यासाठी चाळीसगाव विभागीयस्तरावर स्थापन केलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या पथकाने २३ ग्राहकांकडून ५५,३३८ यूनिटचे ९ लाख ८६ हजार ३० लाख रुपये वसूल केले आहेत. चाळीसगावात एकूण ६८ ग्राहकांकडून १२८३६६ युनिटची २२ लाख ६३ हजार ८१७ रुपयांची वीजचोरी पकडण्यात आली आहे.
वीजजोडणी घेण्याचे आवाहन
महावितरणकडून करण्यात येणारी कारवाई टाळण्यासाठी ग्राहकांनी अधिकृत वीजजोडणी घेऊनच विजेचा वापर करावा, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.