⁠ 
शुक्रवार, मे 17, 2024

50 हजार रुपयांसाठी विवाहितेचा छळ, 7 जणांवर गुन्हा दाखल

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । तुषार देशमुख । टायर दुकानात माल भरण्यासाठी माहेरून पन्नास हजार रुपये आणावे असा तगादा सासरच्या लोकांनी लावला होता दरम्यान माहेरून 50 हजार रुपये आणले नाही त्यामुळे विवाहितेचा छळ केल्याप्रकरणी मालेगाव येथील पतीसह सासरच्या सात जणांवर मेहुणबारे पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चाळीसगाव तालुक्यातील खडकी सिम येथील माहेर असलेल्या परवीन अश्फाक पिंजारी (वय 21)हिचा 2018 मध्ये मालेगाव देवीचा मळा येथील अशपाक शकूर पिंजारी याच्याशी विवाह झाला. लग्नानंतर सासरच्या लोकांनी परवीन ला 1 महिना चांगले नांदवले. त्यानंतर घरकाम कारणावरून तिला त्रास द्यायला सुरुवात केली. तब्बल तीन वर्षापासून सासरच्यांकडून या विवाहितेचा छळ सुरू होता. मुलगा झाल्यानंतरही हा त्रास थांबला नाही त्यानंतर टायर दुकानात माल भरण्यासाठी 50 हजार रुपये घेऊन येण्याची मागणी करीत मानसिक व शारीरिक त्रास या विवाहितेला दिला गेला. शेवटी हा त्रास असह्य झाल्याने विवाहितेने मेहुणबारे पोलिस ठाण्यात धाव घेतली.

महिलेच्या फिर्यादीवरून पतीसह सासरच्या सात लोकांविरुद्ध भादंवि कलम 498, 323, 294, 506, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस पुढील तपास करीत आहे