⁠ 
शनिवार, मे 18, 2024

सहकार महर्षी कै. उदेसिंग पवार यांच्या पुतळ्याचे १६ रोजी अनावरण

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १४ नोव्हेंबर २०२१। शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चु कडू हे मंगळवार दि.१६ रोजी चाळीसगाव तालुका दौऱ्यावर येत आहेत. यावेळी त्यांच्या उपस्थितीत सहकार महर्षी कै.उदेसिंग अण्णा पवार यांच्या पुतळ्याचे अनावरण यासह विविध कार्यक्रम होणार आहेत.

महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चु कडू यांचे मंगळवार दि.१६ रोजी दुपारी २ वाजता चाळीसगाव येथे आगमन होत आहे. दुपारी २ ते २:३० वाजेपर्यंत स्वागत समारंभ होऊन ३ वाजता त्यांच्या हस्ते वरखेडे येथील सर्वोदय शिक्षण प्रसारक संस्थेच्या प्रांगणात सहकार महर्षी कै.उदेसिंग अण्णा पवार यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात येणार आहे. त्यानंतर दुपारी ४.३० वाजता चाळीसगाव येथे दिव्यांग व परितक्त्या यांना गरजू साहित्याचे वाटप करण्यात येणार आहे.

त्यानंतर सामाजिक कार्यकर्ते आरोग्यदूत वर्धमान धाडीवाल यांच्या कार्यालयास भेट देऊन तेथून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पवित्र अस्थिकलश असलेल्या जागेचे ते दर्शन घेणार आहेत. त्यानंतर श्री संत संताजी महाराज यांच्या पुतळ्यास माल्यार्पण करून औरंगाबादकडे रवाना होणार आहेत. कार्यक्रमास नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती द्यावी, असे आवाहन वर्धमानभाऊ धाडीवाल मित्र परिवारच्यावतीने करण्यात आले आहे.