जिल्हा बँक निवडणूक : ऍड.रोहिणी खडसे यांना कल्पना पाटील यांचा पाठिंबा

नोव्हेंबर 11, 2021 5:39 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । ११ नोव्हेंबर २०२१ । जळगाव जिल्हा मध्यवर्ती सह बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीतील शेतकरी विकास पॅनल मधील महिला राखीव प्रवर्गातील उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या उत्तर महाराष्ट्र विभागीय अध्यक्षा कल्पना पाटील यांनी सहकार पॅनलला जाहीर पाठिंबा दिला आहे.

khlse jpg webp

सविस्तर असे की, जळगाव जिल्हा मध्यवर्ती बँकेची रणधुमाळी सुरू आहे. यात शेतकरी विकास पॅनल आणि सहकार पॅनल रिंगणात उतरली आहे. या निवडणुकीतील शेतकरी विकास पॅनलमधील महिला राखीव प्रवर्गातील उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या उत्तर महाराष्ट्र विभागीय अध्यक्षा कल्पना पाटील यांनी सहकार पॅनलच्या महिला प्रवर्गातील उमेदवारी रोहिणी खडसे-खेवलकर यांना जाहीर पाठिंबा दिला आहे.

यांची उपस्थिती होती 

यावेळी माजी मंत्री एकनाथराव खडसे, भुसावळचे नगराध्यक्ष रमण भोळे, राष्ट्रवादी काँग्रेस माजी महानगराध्यक्ष अभिषेक पाटील, तालुका अध्यक्ष यु.डी. पाटील, प्रा.डॉ.सुनिल नेवे, प्रमोद नेमाडे,पुरुषोत्तम नारखेडे, राजु माळी, विलास धायडे, किरण कोलते, बोधराज चौधरी, बापु महाजन, शफी पेहलवान, एजाज खान, उसामा रउफ खान, अखिल चौधरी, सुमित ब-हाटे, व पृथ्वीराज पाटील, उपस्थित होते

चेतन वाणी

पत्रकारिता क्षेत्रात गत ११ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १० वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now