हुंड्यासाठी विवाहितेचा छळ; पतीसह आठ जणांविरोधात गुन्हा दाखल

नोव्हेंबर 9, 2021 3:46 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । ०९ नोव्हेंबर २०२१ । यावल येथे माहेर असलेल्या एका विवाहितेला लग्नात व्यवस्थित हुंडा व पैसे दिले नाही म्हणून, मारहाण करून छळ केला जात असल्याचा प्रकार समोर आला असून, याप्रकरणी विवाहितेच्या फिर्यादीवरून  पतीसह आठ जणांविरोधात यावल पोलीसत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

crime jpg webp

सविस्तर असे की, यावल येथील माहेर असलेल्या मोनिका मिलींद ताडे (वय-२६) रा. माटरगाव ता. शेगाव जि. बुलढाणा यांचा विवाह मिलींद अनिल ताडे यांच्याशी रितीरिवानुसार झाला. काही दिवस चांगले गेल्यानंतर पती मिलींद याने  विवाहितेला लग्नात व्यवस्थित हुंडा व पैसे दिली नाही. या कारणावरून शिवीगाळ करणे व मारहाण करणे सुरू केले. तसेच सासू, आजल सासू, मावस सासू यांनी देखील विवाहितेला शिवीगाळ केली. हा प्रकार सहन न झाल्याने विवाहिता यावल येथील माहेरी निघून आल्या. विवाहितेच्या फिर्यादीवरून यावल पोलीस ठाण्यात पती मिलींद अनिल ताडे, सासू राजकन्या अनिल ताडे, मामे भाऊ सुमित प्रल्हाद विधाते, गैनिनाथा श्रीराम विधाते, आजल सासू कमलबाई श्रीराम विधाते, सुमित्रा विलासराव सौदागरे, रविंद्र भोजकर आणि मिरा भोजकर सर्व रा. माटरगाव ता. शेगाव जि. बुलढाणा यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चेतन वाणी

पत्रकारिता क्षेत्रात गत ११ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १० वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now