अज्ञात चोरट्यांनी दीड लाख रूपयांचा ऐवज लांबविले; गुन्हा दाखल

नोव्हेंबर 9, 2021 3:16 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । ०९ नोव्हेंबर २०२१ । आकाशवाणी चौक परिसरातील दोन ठिकाणी चोरट्यांनी बंद घराचे कुलूप तोडून घरातील सोन्याची अंगठी आणि रोकड असा एकुण दीड लाख रूपयांचा ऐवज लंपास केल्याचा प्रकार ८ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजता उघडकीला आला. याप्रकरणी प्रसाद काळे यांच्या फिर्यादीवरून जिल्हापेठ पोलीसत अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सविस्तर असे की, प्रसाद यशवंत काळे ( वय-४७ ) रा. आसोदा ता. जि.जळगाव ह.मु. गणेश नगर, आकाशवाणीच्या मागे जळगाव हे आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. ते जैन कंपनीत नोकरीला आहे. दिवाळीनिमित्त घरातील सदस्य गावाला गेले होते. प्रसाद काळे यांची कंपनीत रात्रपाळी असल्याने ते ७ नोव्हेंबर रोजी रात्री ११ वाजता घराला कुलूप लावून कामाला निघून गेले. मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी बंद घराचे कुलूप तोडून घरातील कपाटातील सोन्याची अंगठी आणि रोकड असा एकुण ७० हजाराच्या मुद्देमालाची चोरी केली. हा प्रकार ८ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजता उघडकीला आला. त्यानंतर त्यांच्या गल्लीत राहणारे सुभाष अरूण पाटील यांचे देखील बंद घरफोडून घरातील८० हजार रूपयांचे दागिने लांबविल्याचे समोर आले आहे.

याप्रकरणी प्रसाद काळे यांच्या फिर्यादीवरून जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रदीप चांदेलकर करीत आहे.

चेतन वाणी

पत्रकारिता क्षेत्रात गत ११ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १० वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now