दिवाळीच्या दिवशी तरुण शेतकऱ्याची आत्महत्या, तरुणीने संपविले जीवन

नोव्हेंबर 5, 2021 10:25 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । ०५ नोव्हेंबर २०२१ । जामनेर तालुक्यातील सामरोद योगेश सदाशीव धुंदाळे (वय २५) या तरूण शेतकऱ्याने दिवाळीच्या दिवशी नापिकी व कर्जाला कंटाळून गळफास घेतला. तर दुसरीकडे खादगाव येथील पूजा निवृत्ती पाटील ही घरात ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली. दरम्यान, पूजा हिने आत्महत्या का केली याबाबत अद्यापही कळू शकले नाहीय. दरम्यान, ऐन दिवाळी सारख्या प्रकाश पर्वाच्या दिवशी वेगवेगळ्या दोन घटनांनी आशेचे दीप विझल्याने उपजिल्हा रुग्णालय परिसरात जमलेले आप्तेष्ट, नागरिक हळहळ व्यक्त करत होते.

yogesh patil succied jpg webp

याबाबत असे की, सामराेद येथील योगेश धुंदाळे  या तरूण शेतकऱ्याने दिवाळीच्या दिवशी स्वत:च्या शेतात गळफास घेऊन आत्महत्या केली. वडील सदाशिव निना धुंदाळे यांचे वय ६० वर्ष आहे. त्यांच्याकडून शेतीची कामे होत नाहीत. त्यामुळे काही वर्षांपासून योगेश स्वत: शेती करून कुटुंबाचा गाळा चालवत होता. मात्र, यावर्षी अतिवृष्टीमुळे शेतातील पिकाचे प्रचंड प्रमाणावर नुकसान झाले हाेते, तर लागलेला खर्चही निघणार नाही. अशावेळी पुढील काळात घराचा रहाट-गाडा कसा चालवावा, या विवंचनेत असलेल्या योगेश धुंदाळे हे गुरुवारी सकाळी बैलगाडी घेऊन शेतात गेले. तेथेच नैराश्येतून गळफास घेत त्यांनी आत्महत्या केली. बराच वेळ होऊनही योगेश हे जेवणासाठी घरी आले नाही. त्यामुळे योगेशला बोलावण्यासाठी गेले असता त्यांचा मृतदेह झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. त्यांच्या पश्चात आई, वडील, भाऊ, बहिण असा परिवार आहे.

खादगावच्या तरुणीने ओढणीने घेतला गळफास
पूजा निवृत्ती पाटील या खादगाव येथील २१ वर्षीय तरुणीने ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली. यावेळी तीची आई दुसऱ्या खोलीत घरकाम करत होती. काहीतरी आवाज झाल्याने आई तिच्या खोलीकडे गेली. मुलीने गळफास घेतल्याचे लक्षात येताच आईने टाहो फोडला.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now