⁠ 
शनिवार, नोव्हेंबर 23, 2024
Home | जळगाव जिल्हा | जामनेर | स्मशानभूमीसाठी जागा उपलब्ध करून देण्याची मागणी

स्मशानभूमीसाठी जागा उपलब्ध करून देण्याची मागणी

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ४ नोव्हेंबर २०२१। विरशैव लिंगायत गवळी समाजातील प्रथा व परंपरेनुसार मयत व्यक्तीचा दफन विधी करण्यात येतो. या अंतीम विधीसाठी पळासखेडे (मिराचे) ग्रामपंचायतअंतर्गत गावठाण परिसरातील स्वतंत्र जमीन उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी गवळी समाजातर्फे करण्यात आली आहे. दरम्यान, याबाबतचे निवेदन नुकतेच ग्रामपंचायतीला देण्यात आले आहे.

विरशैव लिंगायत गवळी समाजातील प्रथा व परंपरेनुसार मयत व्यक्तीचे दफन विधी करण्यात येतो. या अंतीम विधीसाठी पळासखेडे (मिराचे) ग्रामपंचायत अंतर्गत गावठाण परिसरातील स्वतंत्र जमीन उपलब्ध करून देण्यात यावी, अशा मागणीचे निवेदन महाराष्ट्र राज्य विरशैव लिंगायत गवळी समाज बहुउद्देशीय संस्थेच्या जळगाव शाखेतर्फे उपसरपंच रवींद्र हडप यांना देण्यात आले. निवेदनात, पळासखेडे(मिराचे) ता.जामनेर येथे गवळी वाडा परिसरात साठ ते सत्तर वर्षापासुन गवळी समाज वास्तव्यास आहे. अनेक वर्षांपासून गवळी समाजास दिवंगत व्यक्तीच्या अंतिम दफनविधीसाठी जमीन उपलब्ध नसल्याने गैरसोय निर्माण होत आहे. तरी समाजास स्वतंत्र जमीन उपलब्ध करून देण्यात यावी, असे नमूद करण्यात आले आहे.

निवेदन देतेवेळी जळगाव जिल्हाध्यक्ष दिपक जोमीवाळे, गवळी समाज बहुउद्देशीय संस्थेचे युवा प्रदेश कार्याध्यक्ष कृष्णा गठरी, जिल्हा कार्याध्यक्ष प्रकाश लंगोटे, जिल्हा खजिनदार शंकर काटकर, जिल्हा सहसचिव अशोक जोमीवाळे, ग्रामपंचायत सदस्य दिपक परदेशी, जेष्ठ पंच आनंदा जोमीवाळे, शिदा देवर्षी, लक्सिमन नागापुरे, भागवत चौघुले, विशाल गवळी, विजय गवळी, अनिल गवळी आदी उपस्थित होते.

author avatar
चेतन वाणी
पत्रकारिता क्षेत्रात गत ११ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १० वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट.