शहर वृत्तपत्र विक्रेता मंडळातर्फे मिठाई वाटप
जळगाव लाईव्ह न्यूज । ३ नोव्हेंबर २०२१ । जळगाव शहर वृत्तपत्र विक्रेता मंडळातर्फे १८० वृत्तपत्र विक्रेता बांधव व वृत्तपत्र वाटप करणाऱ्या सहकाऱ्यांना दिवाळीनिमित्त मिठाई व फरसाणचे वाटप करण्यात आले. मंगळवार दि.९ रोजी केमिस्ट भवन येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
जळगाव शहर वृत्तपत्र विक्रेता मंडळातर्फे मंगळवार दि.९ रोजी केमिस्ट भवन येथे आयोजित कार्यक्रमात १८० वृत्तपत्र विक्रेता बांधव व वृत्तपत्र वाटप करणाऱ्या सहकाऱ्यांना दिवाळीनिमित्त मिठाई व फरसाणचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून माजी नगरसेवक श्याम काेगटा, केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष सुनील भंगाळे, खजिनदार श्याम वाणी आदी उपस्थित हाेते. प्रमुख पाहुण्यांचे स्वागत मंडळाचे अध्यक्ष विलास वाणी यांनी तर सत्कार विजय काेतकर यांनी केला. यावेळी वृत्तपत्र विक्रेता बांधवांना स्नेहमेळाव्याच्या निमित्ताने शुभेच्छा देण्यात आल्या.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक गाेपाळ चाैधरी यांनी केले तर आभार रवींद्र जाेशी यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मंडळाचे उपाध्यक्ष नितीन चाैधरी, भालचंद्र वाणी, तुषार चाैधरी, महेश साेनार, हरीष चाैधरी, दिनेश वाणी, रवींद्र येवले, संताेष शेळके, अनिल पाटील, हेमंत खडके आदींनी परिश्रम घेतले.