⁠ 
बुधवार, एप्रिल 24, 2024

खराब झालेल्या कानाचा पडदा, हाडाचे शस्त्रक्रिया करून महिलेला मिळाला दिलासा

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, रुग्णालयाच्या वैद्यकीय पथकाचे यश

जळगाव लाईव्ह न्यूज । १२ नोव्हेंबर २०२२ । गेल्या ७ ते ८ वर्षांपासून कानातून दूषित पाणी येत असल्याची तक्रार घेऊन महिला खाजगी दवाखान्यात आली असता तपासणीअंती कानाचे हाड आणि पडदा पूर्ण खराब झाल्याचे दिसून आले. खाजगी दवाखान्यातील उपचाराचा खर्च परडणार नसल्याने महिला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल झाली. तेथे शासकीय अल्प दरात शस्त्रक्रिया करून महिलेवर यशस्वी औषधोपचार करण्यात आले. नुकताच महिलेला अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांच्या रुग्णालयातून निरोप देण्यात आला.

अमळनेर येथील शीतल प्रसाद चौधरी या ३० वर्षीय महिलेला कानाच्या असह्य आजाराने त्रासले होते. ही महिला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल झाल्यानंतर या ठिकाणी कान नाक घसा शास्त्र विभागाच्या डॉक्टरांनी तपासणी केली. रुग्णालयात या शस्त्रक्रियेसाठी आवश्यक ती साधन सामुग्री शस्त्रक्रिया गृहात उपलब्ध करण्यात आली आहे. त्यामुळे डॉक्टरांनी महिलेला शस्त्रक्रिया निर्णय घेतला.

कान नाक घसा शास्त्र विभागाच्या डॉक्टरांनी तब्बल दोन तास ही शस्त्रक्रिया करून या महिलेला पूर्णतः दिलासा दिला आहे. यानंतर निगराणीखाली ठेऊन योग्य ते औषधोपचार केले. शुक्रवारी अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद, वैद्यकीय उप अधीक्षक डॉ. राहुल वाघ यांच्या उपस्थितीत या महिलेला रुग्णालयातून निरोप देण्यात आला.

महिलेवर उपचार करण्याकामी विभाग प्रमुख डॉ. अक्षय सरोदे, सहायक प्राध्यापक डॉ. निशिकांत गडपायले, डॉ. विनोद पवार, डॉ.ललित राणे, शस्त्रक्रिया गृहाच्या इन्चार्ज परिचारिका निला जोशी, कक्ष ७ च्या इन्चार्ज परिचारिका सुरेखा महाजन आदींनी परिश्रम घेतले.