जळगाव लाईव्ह न्यूज । ७ मे २०२२ । शहरातील रहिवासी तथा युवा नेतृत्व करणारे प्रतिक सपकाळे यांचा पुणे येथे २मे रोजी राज्यस्तरीय युवा भूषण पुरस्काराने सन्मान करण्यात आला.
या प्रसंगी आमदार, खासदार, जिल्हा परिषद अध्यक्ष, शिवसेना जिल्हाप्रमुख, महाकवि वामन कर्डक यांचे हस्ते हा पुरस्कार देण्यात आला. सपकाळे यांना राज्यस्तरीय युवा भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आल्याने सर्वत्र कौतुक होत आहे.