पैशांसाठी विवाहितेचा छळ करणाऱ्या पतीसह सासरच्या मंडळींविरुद्ध गुन्हा

नोव्हेंबर 2, 2021 5:44 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । २ नोव्हेंबर २०२१ । माहेरहून सोन्याची चैन आणि पाच लाख रूपये आणावे, यासाठी विवाहितेचा छळ करणाऱ्या पतीसह पाच जणांविरोधात नशिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

नशिराबाद येथील माहेर असलेल्या शबनमबी शेख वसीम (वय-२२) यांचा विवाह सुरत येथील शेख वसीम शेख सत्तार यांच्याशी २०१७ मध्ये झाला होता. लग्नाच्या काही दिवसानंतर पती शेख वसीम याने विवाहितेला माहेरहून सोन्याची चैन आणि प्लॅट घेण्यासाठी पाच लाख रूपये आणावे अशी मागणी केली. परंतू विवाहितेच्या आईवडीलांची परिस्थिती हालाखीची असल्यामुळे पैश्यांची पुर्तता करू शकल्या नाही. याचा राग येवून पती वसीम शेख याने विवाहितेला शिवीगाळ व मारहाण करण्यास सुरूवात केली. तर सासू, सासरे, मावस सासरे आणि नणंद यांनी मारहाण करून घराबाहेर काढून दिले. हा प्रकार सहन न झाल्याने विवाहिता नशिराबाद येथे माहेरी निघून आल्या.

दरम्यान, शबनमबी यांनी १ नोव्हेंबर रोजी नशिराबाद पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून पती वसीम शेख, सासू अकलीमाबी शेख सत्तार, सासरे शेख सत्तार शेख गफ्फार, नणंद मुन्नीबी शेख अकील आणि मावस सासरे फरीद लुना पहेलवान (सर्व रा. लिंबायत, सुरत) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ अतुल महाजन करीत आहे.

चेतन वाणी

पत्रकारिता क्षेत्रात गत ११ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १० वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now