जळगाव लाईव्ह न्यूज । ०१ नोव्हेंबर २०२१ । दिवाळीच्या पहिल्याच दिवशी धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर जळगाव सराफ बाजारात आज सोने आणि चांदीच्या भावात घसरण दिसून आली. आज जळगाव सराफ बाजारात १० ग्रॅम सोन्याच्या भावात ३४० रुपयांची घसरण झाली आहे. तर चांदी प्रति किलो ४०० रुपयाने स्वस्त झाली आहे. त्यामुळे दिवसापूर्वी सोने-चांदीच्या भावात घसरण दिसून येत आहे.
आजचा भाव
जळगाव सराफ बाजारात सोमवारी २४ कॅरेट सोन्याचे दर ४८,७५० रुपये प्रति तोळा इतका आहे. दुसरीकडे चांदीचा प्रति किलोचा भाव ६६,०५० रुपये इतका आहे. दरम्यान, सराफ व्यवसायिकांकडून सोन्यावर जीएसटी, आयात शुल्क आणि घडणावळ शुल्क आकारले जाते. त्यामुळे दहा ग्रॅम सोन्याचा दागिना खरेदी करताना प्रत्यक्ष बाजार भावात ४ ते ५ हजारांची वाढ होते.
गेल्या काही दिवसात जळगाव सुवर्णबाजारात सोने आणि चांदीच्या दरात चढ-उतार दिसून आला आहे. गेल्या ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीला सोने आणि चांदीच्या भावात वाढ दिसून आली होती. सप्टेंबर महिन्यात ४७ हजाराच्या खाली असलेला सोन्याचा भाव ऑक्टोबरच्या पहिल्याच दिवशी मोठी वाढ होऊन तो पुन्हा ४७ हजारावर गेला. त्यानंतर सोन्याच्या भावात सतत वाढ दिसून आली.
गेल्या ऑक्टोबर महिन्यात सोन्याच्या भावात १६८० रुपयाची वाढ झाली आहे. तर दुसरीकडे चांदीच्या भावात देखील मोठी वाढ दिसून आली. गेल्या महिन्यात चांदीच्या भावात ५५०० हजार रुपयाची वाढ झाली.
दरम्यान, २०२० मध्ये सोन्याच्या किंमतीने सार्वकालिक उच्चांक गाठला होता. त्यावर सोन्याची प्रतितोळा किंमत ५६,२०० रुपयांवर पोहोचली होती. आजच्या दरानुसार सोन्याची किंमत ४८,७५० रुपये प्रतितोळा इतकी आहे. त्यामुळे सोने रेकॉर्ड स्तरापेक्षा ७४५० रुपयांनी स्वस्त मिळत आहे. तर चांदीच्या दरात घसरण होऊन त्याची किंमत प्रतिकिलो ६६, हजारावर आहे.
गेल्या आठवड्यातील सोने दर?
सोमवारी (२५ ऑक्टोबर) २४ कॅरेट सोन्याचे दर ४८,९२० होते, त्यात ४०० रुपयाची वाढ नोंदविली गेली होती. मंगळावारी (२६ ऑक्टोबर) २४ कॅरेट सोन्याचे दर ४९,३३० इतका होता. त्यात ४४१० रुपयाची वाढ झाली होती. बुधवारी (२७ ऑक्टोबर) २४ कॅरेट सोन्याचे (Gold) दर १० ग्रॅममागे ४८,९३० रुपये इतका आहे. गुरुवारी (२८ ऑक्टोबर) २४ कॅरेट सोन्याचे दर ४९,०९० रुपये प्रति तोळा इतका आहे. शुक्रवार (२९ ऑक्टोबर) २४ कॅरेट सोन्याचे दर ४९,०९० रुपये प्रति तोळा इतका आहे.