स्व.सौ. श्र्वेता वाणी-नेवे फाउंडेशनतर्फे दिवाळी साहित्य वाटप
जळगाव लाईव्ह न्यूज । ३० ऑक्टोबर २०२१ । जळगाव येथील स्व.सौ.श्वेता मिलिंद वाणी (नेवे) यांच्या स्मरणार्थ स्व.सौ.श्र्वेता वाणी-नेवे फाऊंडेशनतर्फे मातोश्री आनंदाश्रम येथे आजी व आजोबाना दिवाळी साहित्याचे वाटप करण्यात आले.
स्व.सौ. श्वेता मिलिंद वाणी(नेवे) यांच्या स्मरणार्थ स्व.सौ.श्र्वेता वाणी-नेवे फाऊंडेशनतर्फे केशव स्मृति प्रतिष्ठान संचालित मातोश्री आनंदाश्रम येथे आजी, आजोबाना जेवण व दिवाळीनिमित सुगंधी उटणे, तेल, साबण, पणती व आकाशकंदील आदी साहित्य वाटप करण्यात आले. प्रभाग क्रमांक १२ च्या नगरसेविका गायत्री राणे, प्रकल्प सहप्रमुख संजय काळे, फाउंडेशनचे अध्यक्ष मिलींद वाणी यांच्या हस्ते या साहित्याचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी मातोश्री आनंदाश्रमचे व्यवस्थापक पवन येपुरे, फाऊंडेशनच्या संचालीका राजश्री नेवे, शिखा वाणी, विनंती नेवे, आदित्य नेवे, चंद्रकांत वाणी, संजय नेवे आदी उपस्थित होते.