अ‍ॅड.देवकांत पाटील व योगिता पाटील यांचा उत्कृष्ट कामगिरीबद्दल सत्कार

ऑक्टोबर 25, 2021 4:07 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । २५ ऑक्टोबर २०२१ । यावल येथे माळीज सभागृहातील कार्यक्रमात सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल छत्रपती शिवाजी महाराज फाउंडेशन तथा यावल युवक राष्ट्रवादीचे अध्यक्ष व विरावलीचे ग्रा.पं.सदस्य अ‍ॅड. देवकांत बाजीराव पाटील यांच्यासह त्यांच्या पत्नी सौ.योगिता देवकांत पाटील (संजय गांधी समिती यावल सदस्य) यांचा न्यू बचपन प्ले स्कूल व माळीज क्लासेसचे संथापक अध्यक्ष कैलास माळी सर यांनी व त्यांच्या सहकारी संचालक मंडळाकडून सन्मान चिन्ह देत केला सत्कार करण्यात आला.

devkant patil yogita patil

अ‍ॅड.देवकांत पाटील व योगिता पाटील यांच्या सामाजिक, शैक्षणिक ,राजकीय कार्याची दखल घेत छत्रपती शिवाजी महाराज फाउंडेशनच्या माध्यमातून राबवलेले विविध उपक्रम राबविले. त्यात विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी केलेले नवनवीन नावीन्य पूर्ण प्रयोग याची दखल घेत तसेच कोरूना काळात केलेली जनजागृती, मास वाटप ,सॅनिटायझर वाटप, विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन स्पर्धा,स्पर्धा परीक्षांचे मोफत मार्गदर्शन शिबिर, बेसिक संगणक शिबिर, कोरोना काळात राज्यस्तरीय महाराणा प्रताप यांच्या जयंतीनिमित्त घेतलेली ऑनलाईन स्पर्धा, तसेच रक्त तपासणी शिबिर,रक्तदान शिबिरे शालेय विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करणे, वृक्ष लागवड ,वृक्ष संवर्धन, स्वछता विषयी जनजागृती स्मशान भूमीत साफ सफाई अभियान राबवणे नियमित पणे सामाजिक व शैक्षणिक कार्यक्रम घेणे सामाजिक क्षेत्रात नेहमी सर्वांना मदत करत राहणे राजकीय व्यासपीठाच्या माध्यमातून सामाजिक विषयांना हात घालत राहणे जनहिताचे सर्वसामान्यांचे प्रश्न मार्गे लावण्याचे महत्त्वपूर्ण योगदान याची दखल घेत सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल सन्मान चिन्ह शॉल पुष्पगुछ देऊन सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे संस्थापक कैलास माळी तर सूत्रसंचालन सुधाकर बाऊस्कर यांनी केले.यामध्ये सामाजिक क्षेत्रातील माजी नगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक अतुल पाटील,नगरसेवक डॉ.कुंदन फेगडे,ॲड.देवकांत पाटील तर शैक्षणिक क्षेत्रातील माजी प्राचार्य सुरेश वाघ,मुख्याध्यापक नितीन झांबरे,प्रा.नंदन वळींकार,सुनिल माळी,प्राचार्य एम. के.पाटील,स्निग्धा जोशी,सतिश मोरे आदींचा सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. यावेळी डॉ.जागृती फेगडे,सुनिल देशमुख,गणेश देशमुखे, सुरेखा माळी , छत्रपती फाऊंडेशन संचालक पवन पाटील , हितेश गजरे ,गिरीष पाटील ,किशोर माळी आदी मान्यवर उपस्थित होते. सर्व उपस्थितांचे आभार कार्यक्रमाचे आयोजक कैलास माळी सर यांनी मानले

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now