जळगाव जिल्हा

कोविड-१९ आजाराने मयत झालेल्यांच्या वारसांना मिळणार सानुग्रह अनुदान

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २१ ऑक्टोबर २०२१ । कोविड-१९ या आजाराने मयत झालेल्या व्यक्तींच्या वारसांना सानुग्रह अनुदान देण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने दि. ३० जून २०२१ रोजी आदेश दिलेले आहेत. त्याअनुषंगाने राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांनी दि. ११ सप्टेंबर २०२१ रोजी दिलेल्या मार्गदर्शक सूचनेनुसार कोविड-१९ या आजाराने मयत झालेल्या व्यक्तींच्या वारसांना सानुग्रह अनुदान देण्यासाठी राज्यांना सूचित केलेले आहे. त्यासाठी अर्ज सादर करण्याची ऑनलाईन कार्यपध्दती महाराष्ट्र शासनाकडून लवकरच अधिसूचित करण्यात येणार असून त्याबाबत स्वतंत्रपणे कळविण्यात येणार आहे

आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभागाचे प्रधान सचिव यांनी त्यांचे पत्र दि.१२ ऑक्टोबर २०२१ अन्वये निर्देशित केलेनुसार जळगाव जिल्ह्यातील कोविड-१९ या आजाराने मयत झालेल्या व्यक्तींच्या वारसांना सानुग्रह अनुदान वितरीत करण्यासाठी सक्षम प्राधिकरण व प्राधिकरणाचा पत्ता याप्रमाणे आहे. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, जळगाव टंचाई शाखा, आपत्ती व्यवस्थापन विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव, संपर्क क्रमांक-०२५७-२२१७१९३/२२२३१८०, ई-मेल- [email protected] असा आहे.

तक्रार निवारणासाठी समिती स्थापन
‘कोविड-१९’ मुळे मृत्यू पावलेल्या व्यक्तीच्या वारसाला सानुग्रह अनुदानाबाबत काही तक्रार असल्यास त्यासाठी जिल्हास्तरीय आणि महानगरपालिका क्षेत्र अशा दोन तक्रार निवारण समिती गठित करण्यात आल्या आहेत. जिल्हास्तरीय तक्रार निवारण समिती ही महानगरपालिका क्षेत्र वगळता जिल्ह्यातील इतर क्षेत्रासाठी असून या समितीचे अध्यक्ष जिल्हाधिकारी, जळगाव तर सदस्य सचिव म्हणून जिल्हा शल्य चिकित्सक हे राहतील. तसेच महानगरपालिका क्षेत्राकरीताही तक्रार निवारण समिती राहील. ही समिती मनपा प्रशासकीय क्षेत्रनिहाय असून या समितीचे अध्यक्ष हे मनपा उपायुक्त दर्जाचे अधिकारी असतील तर मनपाचे वैद्यकीय अधिकारी तथा त्यांचे प्रतिनिधी हे समितीचे सदस्य सचिव असतील. असे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी कळविले आहे.

चेतन वाणी

पत्रकारिता क्षेत्रात गत ११ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १० वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट.

Related Articles

Back to top button