भाजपला धक्का, राष्ट्रवादी, शिवसेनेचे तीन उमेदवार बिनविरोध

ऑक्टोबर 18, 2021 5:03 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । १८ ऑक्टोबर २०२१ । जळगाव जिल्हा बँकेच्या निवडणुकीत आमचाच डंका वाजणार असा दावा काही मिनिटांपूर्वी आ.मंगेश चव्हाण यांनी केला होता. मात्र, महाआघाडीतील दोन पक्षांनी भाजपला जोरदार धक्का दिला आहे. उमेदवारी अर्ज दाखल झाल्यानंतर शेवटच्या दिवशी महाविकास आघाडीतर्फे धरणगावातून संजय मुरलीधर पवार, तर पारोळा आणि एरंडोलमधून अनुक्रमे चिमणराव पाटील व अमोल चिमणराव पाटील या तिघांची बिनविरोध निवड निश्‍चीत झाली आहे.

jdcc bank election

जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याचा आज अंतिम दिवस होता. दुपारी तीन वाजेपर्यंत अर्ज दाखल करण्याची मुदत होती. जिल्‍हा बँक आज अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी महाविकास आघाडीतर्फे धरणगावातून संजय मुरलीधर पवार, तर पारोळा आणि एरंडोलमधून अनुक्रमे चिमणराव पाटील व अमोल चिमणराव पाटील या तिघांची बिनविरोध निवड निश्‍चीत झाली आहे. यामुळे महाविकास आघाडीने सर्व जागांवर तयारी करण्याच्या भाजपच्या दाव्याला धक्का देण्याचे काम केले आहे.

बिनविरोध निवड निश्‍चीत झाल्यानंतर जिल्हा बँकेत आमदार चिमणराव पाटील, संजय पवार व अमोल पाटील यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी माजी मंत्री गुलाबराव देवकर, माजी मंत्री डॉ. सतीश पाटील, जिल्हा बँक अध्यक्षा रोहिणी खडसे, शिवसेना जिल्हा प्रमुख विष्णू भंगाळे आदी उपस्थित होते.

 

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now