⁠ 
शुक्रवार, सप्टेंबर 20, 2024
Home | जळगाव जिल्हा | जळगाव शहर | जळगाव लाईव्ह इम्पॅक्ट : प्रभाग १ मध्ये झाली स्वच्छता

जळगाव लाईव्ह इम्पॅक्ट : प्रभाग १ मध्ये झाली स्वच्छता

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १६ ऑक्टोबर २०२१ । जळगावकर हे रस्ते, स्वछता व सुरक्षेबाबत कमनशिबी असल्याचं चित्र नेहमी समोर येत आहे. जळगावात एकूण १९ प्रभाग असून प्रभाग क्रमांक १ येथील स्थायिक रहिवाशांनी आपल्या समस्या जळगाव लाईव्हकडे मांडल्या होत्या. जळगाव लाईव्हने थेट प्रक्षेपण करून समस्या समोर आणल्या होत्या. जळगाव लाईव्हच्या वृत्ताची दखल घेत तात्काळ स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.

जळगावकरांच्या समस्या संपतासंपत नाही. दररोज नवीन समस्या येऊन उभी राहते परंतु जुन्या समस्यांचा तोडगाच निघालेला नसतो. असच प्रभाग क्रमांक १ मधील महावीरनगर, दूध फेडरेशन जवळचे स्थानिक रहिवाशी यांनी आपली व्यथा जळगाव लाईव्ह न्यूज जवळ व्यक्त केली होती. जळगाव लाईव्ह न्यूजने थेट प्रभाग गाठत नागरिकांच्या समस्या समोर आणल्या होत्या.

स्थायिक रहिवाश्यांच्या म्हणण्यानुसार त्यांच्या प्रभागात स्वच्छता कर्मचारी येत नाही, आलेत तर काम करत नाही, कचऱ्याची गाडी देखील नियमित येत नाही, शिवाजीनगर उड्डाण पूल बंद असल्याने येथील रस्त्यावर अवजड वाहनांची वाहतूक वाढल्याने धुळीचा त्रास होतो. धुळीमुळे अनेक नागरिकांना आरोग्याशी संबांधीत तक्रारी देखील उध्दभवायला लागल्या आहे. प्रवास करण्यासाठी एकमेव रस्ता असून त्यात मोठे मोठे खड्डे झाले आहेत.

काल दसऱ्यासारख्या सणाला अनेकांच्या दारापुढे रांगोळी असते परंतु महावीर नगरच्या नागरिकांच्या दारापुढे कचऱ्याचं साम्राज्य होते. १५ ऑक्टोबर रोजी नागरिकांनी आपल्या समस्या जळगाव लाईव्ह न्यूजच्या माध्यमातून मनपा प्रशासनापर्यंत पोहोचविल्या. जळगाव लाईव्हची दखल घेत त्या समस्यांवर संबंधित नगरसेवक व प्रशासनाने त्वरित स्वच्छता कर्मचारी पाठवत येथील परिसराची साफसफाई करून घेतली. परिसरातील नागरिकांनी तात्काळ साफसफाई झाल्याने जळगाव लाईव्हचे आभार व्यक्त केले आहे.

author avatar
टीम जळगाव लाईव्ह