---Advertisement---
गुन्हे चाळीसगाव

तरवाडे येथील २३ वर्षीय युवकाचा पाण्यात बुडून मृत्यू

crime
---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । १६ ऑक्टोबर २०२१ । चाळीसगाव तालुक्यातील तरवाडे येथील २३ वर्षीय युवकाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. रविंद्र अशोक गरूड (वय-२३) असे या मृत युवकाचे नाव असून ही घटना आज शनिवारी सकाळी घडली. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, याप्रकरणी ग्रामीण पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

crime

याबाबत असे की, तरवाडे येथील रविंद्र गरूड या युवकाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना आज रोजी सकाळी १० वाजताच्या सुमारास उघडकीला आली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान घटनेची माहिती मिळताच ग्रामीण पोलीसांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली.

---Advertisement---

रविंद्र गरुड यास चाळीसगाव ग्रामीण रूग्णालयात शवविच्छेदनासाठी नेण्यात आले असून वैद्यकीय अधिकारी यांच्या खबरीवरून चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्थानकात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या निर्देशानुसार पुढील तपास नितीन सोनवणे हे करीत आहेत.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---