जळगावकरांनो काळजी घ्या ! जिल्ह्यात ‘या’ तारखेला वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता

ऑक्टोबर 14, 2021 12:48 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । १२ ऑक्टोबर २०२१ । राज्यात मान्सूनच्या परतीचा प्रवास सुरू झाला आहे. यामुळे राज्यातील अनेक ठिकाणी पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. दरम्यान,  जळगाव जिल्ह्यातील काही ठिकाणी 16 व 17 ऑक्टोबर, 2021 रोजी वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवलेली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील शेतकरी, नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन कृषि विभागातर्फे करण्यात आले आहे.

rain 1 jpg webp

जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी खरीप हंगामातील शेतमालाची काढणी करावी व शेतात साठवणूक केलेला शेतमाल सुस्थितीत योग्य ठिकाणी ठेवावा. जेणेकरुन वरील कालावधीत होणाऱ्या वादळी वारा, अवकाळी पावसापासून शेतमालाचे संरक्षण करणे सोयीचे होईल, असेही जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संभाजी ठाकूर यांनी प्रसिध्दीस दिलेल्या शासकीय पत्रकात म्हटले आहे.

दरम्यान, आज जळगाव जिल्ह्याला यलो अलर्ट देण्यात आला आहे. जिल्ह्यात मागील जवळपास दीड महिन्यांपासून पाऊस कोसळत आहे. सुरुवातीला मान्सूनने जिल्ह्याकडे पाठ फिरवल्याने शेतकरी वर्ग संकटात आला होता. परंतु गेल्या काही दिवसापासून पाऊस कोसळत असल्याने आता शेतकऱ्यांसमोर पिकांच्या नुकसानीचे संकट उभे आहे.

आधीच पावसाने पिकांचे नुकसान झाले आहे. त्यात उरले-सुरले पीक हाती येणार असे शेतकऱ्यांना वाटत असताना आता आणखी पावसाचा अंदाज वर्तविण्यात आल्याने उरले-सुरले पीकही वाया जाण्याची भीती शेतकऱ्यांमध्ये आहे. जिल्ह्यातील काही ठिकाणी 16 व 17 ऑक्टोबर, 2021 रोजी वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवलेली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील शेतकरी, नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन कृषि विभागातर्फे करण्यात आले आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now