जळगाव लाईव्ह न्यूज । १० ऑक्टोबर २०२१ । रात्री पाणी सोडल्याच्या कारणावरून दोन गटात हाणामारी झाल्याची घटना यावल तालुक्यातील शिरसाड येथे शुक्रवारी घडली. याप्रकरणी आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यावल तालुक्यातील शिरसाड येथे शुक्रवारी रात्री पाणी सोडल्याच्या कारणावरून दोन गटात हाणामारी झाली. दरम्यान, याबाबत कोणीतरी शिरसाड येथे दोन गटात हाणामारी सुरु असल्याची माहिती यावल पोलिसांना दिली. माहिती मिळाताच पोलिसांचे पथक तात्काळ गावात दाखल झाले. मात्र, त्यानंतरही दोन्ही गट ऐकण्याच्या मनस्थितीत नसल्याने दोन्ही गटातील रमेश रामचंद्र इंगळे, अरुण पुना जाधव, प्रभाकर पुना जाधव, गौतम रमेश इंगळे यांच्यासह चार अज्ञात महिलांवर सार्वजनिक शांततेचा भंग केल्याप्रकरणी उपनिरीक्षक जितेंद्र खैरनार यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास हवालदार संजय देवरे करीत आहेत.