गुन्हेयावल

घृणास्पद : दहा रुपयांचे आमिष देत ३ वर्षीय चिमुकलीवर अत्याचार

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ९ ऑक्टोबर २०२१ । यावल तालुक्यातील दहिगावमध्ये एक संतापजनक घटना समोर आलीय. एका २५ वर्षीय तरुणाने ३ वर्षाच्या बालिकेवर अत्याचार केल्याचा प्रकार घडलाय. कैलास प्रल्हाद पाटील (वय २५) असे संशयित नराधमाचे नाव असून त्याला अटक करण्यात आली आहे. त्याच्याविरुद्ध यावल पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत असे की, दहीगाव येथे एक मजूर कुटुंब आपल्या एक मुलगा आणि एक मुलीसह भाड्याच्या घरात राहतात. घर मालकाचा मुलगा कैलास प्रल्हाद पाटील (वय२५) याने काल सायंकाळी चार ते साडेचारच्या दरम्यान, त्यांच्या तीन वर्षाच्या मुलीला दहा रूपये देण्याचे आमीष दाखवून घरात नेले. आणि तिच्यावर अत्याचार केला. बालिकेची आई घरी आली असता तिला हा सर्व प्रकार समजला. तिने कैलासच्या कानशिलात लगावली असता तो तेथून पळून गेला.

दरम्यान, याप्रकरणी बालिकेच्या कुटुंबीयांनी आज यावल पोलीस स्थानक गाठून फिर्याद दिली. यानुसार संशयित कैलास पाटील याच्या विरूध्द भादंवि कलम ३७६, ३७६-अ, ३७५, ३५४, तसेच पोक्सो कायद्यातील कलम ३, ४ आणि ८ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

घटनेचे गांभिर्य लक्षात घेऊन पोलीस उपनिरिक्षक विनोद खांडबहाले यांच्या आदेशावरून पोलीस हेड कॉस्टेबल अस्लम खान यांनी दहिगाव येथे जावुन आरोपी हा पळवुन जाण्याच्या बेतात असतांना त्यास अटक करण्यात आली आहे . या कामी त्यांना दहीगाव येथील गृहरक्षक दलाचे जनार्दन महाजन यांनी सहकार्य केले. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरिक्षक विनोद मधुकर खांडबहाले हे करीत आहेत.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button