⁠ 
गुरूवार, डिसेंबर 12, 2024
[aioseo_breadcrumbs]

धक्कादायक! पैसे पडल्याचे भासवून चोरट्यांनी लांबवली १ लाखाची रोकड

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ३ मे २०२२ । पाठीमागे पैसे पडल्याचे भासवून दोन अज्ञातांनी ४० वर्षीय व्यक्तीच्या हातातील १ लाख रूपयांची रोकड असलेली पिशवी धुमस्टाईल लांबविल्याची धक्कादायक घटना घडली. याप्रकरणी सावदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.

अधिक माहिती अशी की, रमेश यादव महाजन (वय-४०) रा. गोरडखेडा ता. रावेर हे शेती करून आपला उदरनिर्वाह करतात. २मे रोजी सावदा येथील पंजाब नॅशनल बँकेजवळ त्यांच्या दुचाकीजवळ उभे होते. त्यावेळी अज्ञात दोन जण त्यांच्या दुचाकीजवळ आले व त्यांच्या दुचाकीजवळ पैसे टाकून म्हणाले की, पैसे पडले आहे. असं सांगितले असता त्यांच्या हातातील १ लाख रूपयांची रोकड असलेली पिशवी हिसकावून धुमस्टाईल लांबविली. त्यांनी आरडाओरड केली परंतू तोपर्यंत चोरटे पसार झाले होते. रमेश महाजन यांनी तातडीने सावदा पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारी वरून अज्ञात दोन जणांविरोधात गुन्हा दाखल झाला. पुढील तपास सहाय्यक फौजदार अन्वर तडवी करीत आहे.