जळगाव लाईव्ह न्यूज | ७ ऑक्टोबर २०२१ । यावल तालुक्यातील कोरपावली येथील महेंद्र पंडित पाटील हे भारतीय सैन्य दलात नायक पदावर कार्यरत होते. ते दिनांक ३० सप्टेंबर रोजी सैन्यदलामधून नायक या पदावरून सेवानिवृत्त झालेत. त्यांचे छत्रपती शिवाजी महाराज फाउंडेशनतर्फे यावलमध्ये जल्लोषात स्वागत करण्यात आले.
महेंद्र पाटील हे २५ सप्टेंबर २००१ रोजी जळगावला आर्मीमध्ये भरती झाले होते. ट्रेनिंगनंतर त्यांनी भारतातील विविध राज्यांमध्ये सेवा दिली ज्यात राजस्थान, जम्मू-काश्मीर, गुजरात, जम्मू काश्मीर, राजस्थान, जोधपुर, आसाम, युपी अशा विविध राज्यांमध्ये वीस वर्ष सेवा देऊन दि. ३०/९ /२०२१ रोजी सेवानिवृत्त झाले. आपल्या गावी येत असताना यावलमध्ये कृषी उत्पन्न बाजार समिती सभागृहात त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादीचे युवक काँग्रेस तालुकाध्यक्ष तथा छत्रपती शिवाजी महाराज फाउंडेशनचे अध्यक्ष व विरावली ग्रामपंचायतीचे ग्रामपंचायत सदस्य ऍड. देवकांत पाटील, दिनकर पाटील, विरावली विकास सोसायटीचे माजी चेअरमन संजय पाटील, नायगाव शाळेचे उपशिक्षक बी.डी. पाटील, विरावली गावातील माजी सैनिक अर्जुनराव पाटील, छत्रपती शिवाजी महाराज फाउंडेशनचे संचालक गिरीश पाटील, विरावली गावातील जेष्ठ नागरिक आत्माराम धनगर, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष राकेश सोनार, कार्याध्यक्ष नरेंद्र शिंदे, हितेश गजरे, गोलू माळी, कोरपावली गावचे भरत चौधरी, कोडवद गावातील समाजसेवक किशोर पाटील, अक्षय पाटील, अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे अध्यक्ष अनिकेत सरोटे आदींनी महेंद्र पंडित पाटील व त्यांच्या सौभाग्यवती यांच्यासह सर्व परिवाराचे शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व भारत मातेची प्रतिमा सप्रेम भेट देऊन सत्कार केला. कार्यक्रमाचे आयोजन छत्रपती फाउंडेशनच्या वतीने देवकांत पाटील व सहकाऱ्यांनी केले होते.