दरवाढीचा झटका : जळगावात पेट्रोल ११० रुपयांवर तर डिझेल शंभरीच्या उंबरठ्यावर

ऑक्टोबर 7, 2021 12:42 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । ७ ऑक्टोबर २०२१ । पेट्रोलियम कंपन्यांनी आज सलग सातव्या दिवशी पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ केली आहे. इंधनाच्या दरात होत असलेल्या वाढीमुळे ऐन सणासुदीत देशात महागाईचा भडका उडण्याची शक्यता आहे. दरम्यान, जळगावमध्ये प्रति लिटर पेट्रोल ११० रुपयांवर गेले आहे. तर डिझेलशंभरीच्या उंबरठ्यावर आहे. आज गुरुवारी पेट्रोलचा दर ११०.४४ रुपये प्रति लिटरवर आले आहे. तर डिझेलचा दर ९९.१७ रुपये प्रति लिटर इतके आहे.

petrol diesel

आधीच कोरोना संकटाने गेल्या दीड वर्षात अनेकांचे रोजगार गेले. कुटुंबप्रमुखांना संसार चालवताना अजूनही तारेवरील कसरत करावी लागत आहे. त्यात आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडींमुळे गेल्या काही महिन्यांपासून इंधनाचे दर तेजीत आहेत. पेट्रोलच्या किमतीत भरमसाठ वाढ झाली आहे.

Goodreturns या बेवसाईटनुसार जळगावमध्ये गेल्या ७ दिवसात पेट्रोल जवळपास दीड रुपयाने महागले आहे. १ जानेवारी २०२१ रोजी पेट्रोल दर प्रति लिटर ९१ रुपयापर्यंत होते. ते आज ११० रुपयांवर गेले आहे. म्हणजेच गेल्या १० महिन्यात पेट्रोल दर जवळपास २० रुपयाने महागले आहे. तर दुसरीकडे गेल्या आठवड्यात डिझेल दर जवळपास २ रुपयाने महागले आहे. २०२१  सुरवातीला डिझेल चा दर ८० रुपये होता. तो आता ९९ रुपयांवर गेला आहे. म्हणजेच डिझेलच्या दरात देखील गेल्या १० महिन्यात १९ रुपयाहुन अधिक वाढ झाली.

गेल्या महिन्यात (सप्टेंबर) एकवेळा ३८ पैशांनी पेट्रोलचे दर कमी झाले होते. त्यानंतर दिवसेंदिवस भाव वाढते असल्याने सामान्यांच्या खिशाला झळ बसत आहे. बजेट कोलमडून महिन्याच्या खर्चात सरासरी वीस टक्के वाढ झाली आहे.

दरम्यान, आंतरराष्ट्रीय पातळीवर कच्च्या तेलाचा पुरवठा मागणीच्या तुलनेत कमी होत असल्याने खनिज तेलाचे दर वाढत आहेत. त्यामुळे येत्या एक ते दोन आठवड्यांत देशांतर्गत बाजारात पेट्रोलच्या किंमतीत झपाट्याने वाढ होऊ शकते. अनेक शहरांमध्ये ते ११० रुपयांवर गेले आहे.

आधीच पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती कळस गाठत असताना घरगुती गॅस सिलेंडरच्या दरातही वाढ करण्यात आली आहे. पेट्रोलियम कंपन्यांनी बुधवारी विनाअनुदानित १४.२ किलोच्या सिलेंडरच्या दरात १५ रुपयांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे जळगावात विनाअनुदानित गॅस सिलेंडरची किंमत ९०४.५० रुपये इतकी झाली आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now