शिरसोलीत प्रौढाने गळफास घेत संपविले जीवन

ऑक्टोबर 4, 2021 2:42 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । ४ ऑक्टोबर २०२१ ।  जळगाव तालुक्यातील शिरसोली प्र.न. येथे एकाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज उघडकीला आली. पंढरीनाथ नामदेव संनसे (वय ४५) असे मृताचे नाव असून त्यांनी आत्महत्या का केली याचे कारण अद्यापही कळू शकले नाही. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात नोद करण्यात आली आहे.

new 10 1 jpg webp

याबाबत असे की, शिरसोली प्र.न. येथे दत्त मंदिरच्या मागे राहणारे पंढरीनाथ संनसे यांनी घरी कोणी नसताना राहत्या घरात छताच्या हुकाला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. संनसे हे मुळ खामगाव येथिल रहिवासी आहेत. वीस वर्षांपासून ते शिरसोली प्र.न. येथे राहात आहे. जैन कंपनीत ते कमला आहेत. त्यांनी घर बाधकामासाठी कर्ज काढलेले आहे. त्यांनी आत्महत्या का केली याबाबत अद्यापही कळू शकले नाही.

दरम्यान, पोलीस पाटील श्रीकृष्ण बारी यांनी गळफासाची दोरी कापून संनसे यांना जळगावच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. तेथील सीएमओ डॉ.श्रीमती अच्छा यांनी तपासून त्यांना मयत घोषित केले. यानंतर शवविच्छेदन प्रक्रिया सुरु झाली. त्याच्या पश्चात पत्नी,२ मुले व १ विवाहित मुलगी असा परिवार आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now