१९ वर्षीय तरुणीची गळफास घेऊन आत्महत्त्या

ऑक्टोबर 3, 2021 1:55 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । ३ ऑक्टोबर २०२१ । घरात सर्जन झोपलेले असतांना १९ वर्षीय तरूणीने राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना यावल शहरातील फालक नगरात घडली. याबाबत यावल पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Untitled design 2021 10 03T135357.604 jpg webp

पुजा भैरवलाला प्रजापती (वय-१९) ही तरूणी आपल्या कुटुंबियांसह यावल शहरातील फालक नगरात वास्तव्यास आहे. पुजा हिने रात्री कुटुंबियांसह जेवण केले व झोपून गेले. दरम्यान, मध्यरात्री घरात सर्वजण झोपलेले असतांना तिने घराच्या छताच्या लोखंडी पाईपाला दोरी बांधून गळफास घेवून आत्महत्या केली. वडील भैरवलाल प्रजापती हे सकाळी ७ वाजता उठल्यावर हा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी भैरवलाल प्रजापती यांनी दिलेल्या खबरीवरून यावल पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पो.कॉ. नेताजी वंजारी करीत आहे. तरूणीने गळफास घेतल्याचे कारण मात्र समजू शकले नाही.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now