दुर्दैवी ! मित्राला वाचवताना तरुणाचा बुडून मृत्यू

ऑक्टोबर 3, 2021 10:10 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । ३ ऑक्टोबर २०२१ । पाण्यात बुडणाऱ्या मित्राला वाचवण्याच्या प्रयत्नात तरुणाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना पाराेळा तालुक्यातील लाेणी येथे नदीत घडली. दीपक भील असे मृत तरुणाचे नाव आहे.

New Project jpg webp

याबाबत असे की, लाेणी बुद्रुक ते लाेणी खुर्द या दाेन्ही गावांना जाेडणारा रस्ता अाहे. या ठिकाणी एक लहान पुल असून दाेन्ही गावातील ग्रामस्थ ये-जा करण्यासाठी या पुलाचा वापर करत असतात. या पुलाची अाता दयनीय अवस्था झाली असून पुलावर माेठ-माेठे खड्डे पडले अाहेत. परंतु, प्रशासनाने या गंभीर बाबीकडे दुर्लक्ष करत पुलाची डागडुजी केली नव्हती.

परिणामी या पुलाखाली असलेल्या नाल्यातील खड्ड्यात माेठ्या प्रमाणात पाणी साचले हाेते. दरम्यान, याच ठिकाणी २ अाॅक्टाेबर राेजी दुपारी १ वाजता लाेणी येथील दीपक संदीप भील व त्याचे काही मित्र गेले हाेते. या वेळी किशाेर दिनकर हा तरुण पाय घसरून पाण्यात बुडू लागला. त्याला वाचवण्याच्या प्रयत्नात दीपक भील याचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. दीपक हा घरातील कर्ता असल्याने त्याच्या परिवारावर दु:खाचा डाेंगर काेसळला अाहे. या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त हाेत अाहे. दरम्यान, घटनास्थळी बघ्यांनी माेठ्या प्रमाणात गर्दी केली हाेती.

 

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now