पाण्याचा अंदाज न आल्याने वृद्धा बुडाली

ऑक्टोबर 1, 2021 2:40 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । १ ऑक्टोबर २०२१ । नदीतील पाण्याचा अंदाज न आल्याने पाय घसरून डोहात पडल्याने ६८ वर्षीय वृद्धेचा मृत्यू झाल्याची घटना घडली. याप्रकरणी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Untitled design 2021 10 01T143855.424

लमांजन (ता. जळगाव) येथील रहिवासी हिराबाई पाटील ( वय-६८) या प्रातविधीसाठी गिरणा नदीच्या काठावर गेल्या होत्या. नदीतील पाण्याचा अंदाज न आल्याने त्यांचा पाय घसरून त्या नदीतील डोहात पडल्या असाव्यात असे सांगण्यात येत आहे. पहाटे ५ वाजता गेलेल्या हिराबाई पाटील ७ वाजल्यानंतरही घरी न परतल्याने त्यांचा पुतण्या गोरख पाटील हे त्यांना शोधण्यासाठी गेले असता त्यांना नदी काठावर त्यांची बादली आणि चष्मा त्या ठिकाणी पडलेला दिसून आला. ग्रामस्थ आणि कुटुंबीयांनी २ तास शोधाशोध केल्यानंतर त्यांचा मृतदेह एका काटेरी झुडुपात अडकलेला आढळून आला. नदीपात्रातून हिराबाई पाटील यांचा मृतदेह काढताना पोलिसांना माहिती देण्यात आली. त्यानंतर त्यांचा मृतदेह जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात शव विच्छेदनासाठी नेण्यात आला. याप्रकरणी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. हिराबाई पाटील यांच्या पश्चात १ मुलगा, सून, नातवंडे, पुतणे असा परिवार आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now