उद्यापासून शिवभोजन थाळीसाठी मोजावे लागतील इतके पैसे

सप्टेंबर 30, 2021 4:31 PM

जळगाव लाईव्ह न्यूज | ३० सप्टेंबर २०२१ | जिल्ह्यात एप्रिल ते सप्टेंबर या सहा महिन्याच्या कालावधीत १ लाख २२ हजार ७७१ शिवभोजन स्थळ मोफत देण्यात आले आहेत. मात्र आता राज्य शासनाने ही मोफत थाळी बंद केली आहे. याउलट आता नागरिकांना ही थाळी मिळविण्यासाठी दहा रुपये मोजावे लागणार आहेत. उद्या १ ऑक्टोबर पासून हे दर लागू होणार आहे. याच बरोबर राज्य शासनाने लॉकडाउनच्या काळात वाढवून दिलेल्या दीडपट इच्छा देखील बंद केले आहेत आता जिल्ह्यात केवळ ४६०० थळ्या दिल्या जाणार आहेत.

shivbhojan

राज्य शासनाने 15 एप्रिलपासून या योजनेला सुरूवात केली होती ही योजना 30 सप्टेंबर रोजी बंद होणार आले आहे. टाळेबंदी नंतर आता सर्व व्यवहार जवळपास सुरळीत झाले आहेत त्यामुळे मोफत हाय सरकारने बंद केली आहे. याचबरोबर जिल्ह्यातील शिवभोजन केंद्रांमधील उपलब्ध करून देण्यात आलेली पार्सल सुविधा यापुढे पण करण्यात आली आहे.

 

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now