जवाहर नवोदय विद्यालयामध्ये नववीसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू

सप्टेंबर 29, 2021 5:36 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । २९ सप्टेंबर २०२१ । जवाहर नवोदय विद्यालयातील नववीच्या वर्गात प्रवेशासाठी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची सुरुवात झालेली आहे. प्रवेश परीक्षा अर्ज ऑनलाइन पध्दतीनेच भरावयाचे आहेत. या  प्रक्रियेची शेवटची तारीख 31 ऑक्टोबर, 2021 आहे. परीक्षा 9 एप्रिल, 2022  रोजी जवाहर नवोदय विद्यालय, साकेगाव, ता. भुसावळ येथे निर्धारित केलेल्या परीक्षा केंद्रावर 10.00 ते 12.30 या कालावधीत होईल. या परीक्षेचे माहितीपत्रक व प्रवेश अर्ज लिंक  www.navodaya.gov.in  किंवा www.nasadmissionclassnine.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

online application

सर्व संबंधितांनी माहितीपत्रकाचे काळजीपूर्वक वाचन करून यंदा आठवीमध्ये शिकत असलेले सर्व विद्यार्थी या प्रवेश परीक्षेचा ऑनलाइन अर्ज करण्यास पात्र आहेत. जिल्ह्यातील आठवीमध्ये शिकत असलेले विद्यार्थी व संबंधित पालकांनी नोंद घ्यावी, असे जवाहर नवोदय विद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. आर. खंडारे यांनी प्रसिध्दीस दिलेल्या शासकीय पत्रकान्वये कळविले आहे. अधिक माहितीसाठी आर. पी. पाण्डेय (8668389523), जी.आर. सरनाईक (8208888537) यांच्याशी सपर्क साधण्याचे आवाहन प्राचार्य श्री. खंडारे यांनी केले आहे.

 

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now