जळगाव लाईव्ह न्यूज । २९ सप्टेंबर २०२१। जिल्ह्यात सुरु असलेल्या मुसळधार पावसाचा शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांनीही बसत आहे. सावदा (ता. रावेर) येथे मुसळधार पावसामुळे घर कोलमडून पडल्याची घटना रविवारी घडली. दरम्यान, कुटुंबीय बाहेरगावी गेलेले असल्याने जिवीतहानी टळली.
रावेर तालुक्यातील सावदा येथे रविवार दि.२७ रोजी रात्री १० वाजेच्या सुमारात मुसळधार पाऊस पडत असताना शेखपुरा भागातील सलीम खान मुस्तफा खान उर्फ भुऱ्या यांचे घर कोसळून पडल्याची घटना घडली आहे. खान कुटुंबीय हे दि.२६ रोजी त्यांची बुऱ्हाणपूर येथे नातेवाईकांकडे गेले होते. म्हणून सुदैवाने घरात कोणी नसल्यामुळे जिवीत हानी टळली. मात्र घरातील संसार उपयोगी साहित्याचे नुकसान झाले आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच राष्ट्रवादीचे नगरसेवक फिरोज खान पठाण व सावदा पोलिस ठाण्याचे एपीआय देविदास इंगोले यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.त्यानंतर दि.२८ रोजीतलाठी शरद पाटील यांनी घटनास्थळी जाऊन घटनेचा पंचनामा केला. यात घराचे सुमारे 66 हजार रूपयांचे नुकसान झाले आहे.