त्या आरोपीला केली पोलिसांनी अटक

सप्टेंबर 29, 2021 12:33 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । २९ सप्टेंबर २०२१ । जळगाव शहर महानगरपालिकेचे उपमहापौर कुलभूषण पाटील यांच्यावर गोळीबार करणार्‍या सहाव्या संशयित आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.

crime

उपमहापौर कुलभूषण पाटील यांच्यावर गोळीबार झाल्याची घटना २५ जुलै रोजी रात्री घडली होती. सुदैवाने या हल्ल्यात ते बचावले. होते. या प्रकरणी रामानंदनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. गुन्ह्यातील बेपत्ता संशयित भूषण बिर्‍हाडेला मंगळवारी रोजी पोलिसांनी अटक केली. किरकोळ कारणावरुन झालेल्या वादात उपमहापौर पाटील यांच्यावर किरण राजपूत, उमेश राजपूत, मंगल राजपूत, जुगल बागुल, महेंद्र राजपूत व भूषण बिर्‍हाडे यांनी पाटील यांच्या घरी जाऊन गोळीबार केला होता.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now