जळगाव लाईव्ह न्यूज । २८ सप्टेंबर २०२१ । आंतरराष्ट्रीय बाजारातील सकारात्मक घडामोडींमुळे आज बाजारपेठेत सोने आणि चांदीच्या भावात वाढ होताना दिसली. जळगाव सराफ बाजार पेठेत सुरु असलेल्या सोने आणि चांदीच्या दराला ब्रेक लागला आहे. आज दोन्ही धातूंमध्ये वाढ झाली. आज मंगळवारी प्रति १० ग्रॅम सोन्याच्या भावात ८० रुपयाची घसरण झाली आहे. तर चांदी प्रति किलो ७०० रुपयाने घसरली आहे. त्यापूर्वी काल प्रति १० ग्रॅम सोन्याच्या भावात ७० रुपयाने तर चांदी प्रति किलो ८५० रुपयाने घसरली होती.
जळगावच्या सराफ बाजारात गेल्या काही दिवसांपासून सोन्या-चांदीच्या दरात चढ-उतार होतानाचे दिसून येत आहे. काल आठवड्यच्या पहिल्याच दिवशी सोने आणि चांदीच्या भावात घसरण झाली होती. तर मागील आठवड्यात देखील दोन्ही धातूंच्या किंमतीत घट दिसून आली. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याचे दागिन्यांच्या किमती भारतभर बदलतात.
आजचा सोने आणि चांदीचा भाव :
आज (२८ सप्टेंबर) जळगाव सराफ बाजार पेठेमध्ये प्रति १० ग्रॅम सोन्याचे दर ४७,१५० रुपये इतका आहे. तर चांदीचे (Silver) दर किलोमागे ६२,०६० रुपये इतका आहे.
दरम्यान, कोरोनामुळे लॉकडाऊन करण्यात आल्याने सोने-चांदीच्या भावात प्रचंड वाढ झाली होती. गेल्या वर्षी ऑगस्ट २०२० मध्ये सोन्याचा प्रति तोळ्याचा भाव ५६२०० वर गेला होता. परंतु त्यात घसरण होऊन आता सोन्याचा प्रति तोळ्याचा भाव ४७,१४० रुपयांपर्यंत आला आहे.
सध्या पितृपक्ष सुरु असल्याने सोन्याची खरेदी आणखी खालावून किंमतीत घट होण्याची शक्यता आहे. यानंतर दसरा आणि दिवाळीच्या काळात सोन्याच्या किंमतीत पुन्हा वाढ होऊ शकते. त्यामुळे व्यावहारिकदृष्ट्या सध्याचा काळ हा सोने खरेदीसाठी उत्तम संधी असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.
लसीकरणाचा वाढलेला आणि अर्थव्यवस्थेतील सुधारणेमुळे भारतात सोन्याचे भाव कमी होत आहेत. याशिवाय, अमेरिकन फेडरल बँकेकडून देण्यात आलेल्या व्याज दरवाढीच्या संकेतांमुळेही सोन्याच्या किंमतीवर दबाव दिसून येत आहे.
डिसेंबर महिन्यापर्यंत सोन्याचा भाव 52 हजारांपर्यंत पोहोचणार?
गेल्या काही महिन्यांपासून सोन्याचा दर एका विशिष्ट पातळीत वरखाली होताना दिसत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडींमुळे सोन्याच्या किंमतीवर दबाव असून सोने ४८ हजारांच्या खाली आले आहे. आगामी काळ सणासुदीचा असल्याने सोन्याचे भाव पुन्हा वरच्या दिशेने प्रवास करु शकतात. डिसेंबर महिन्यापर्यंत सोन्याचा भाव पुन्हा ५२ हजार रुपये प्रतितोळा इतका होईल, असेही सांगितले जात होते.
मागील आठवड्यातील दर :
जळगाव सराफ बाजारात आठवड्याच्या पहिल्याच दिवशी म्हणजे सोमवारी (२० सप्टेंबर) २४ कॅरेट सोन्याचे दर ४७,०६० होते. तर मंगळावारी (२१ सप्टेंबर) वाढ होऊन २४ कॅरेट सोन्याचे दर ४७,३६० होते. तर आज बुधवारी (२२सप्टेंबर) २४ कॅरेट सोन्याचे (Gold) दर १० ग्रॅममागे ४७,७३० रुपये इतका आहे. गुरुवारी (२३ सप्टेंबर) २४ कॅरेट सोन्याचे (Gold) दर १० ग्रॅममागे ४७,७७० रुपये इतका आहे. तर शुक्रवारी (२४ सप्टेंबर) २४ कॅरेट सोन्याचे (Gold) दर १० ग्रॅममागे ४७,१४० रुपये इतका होता. शनिवारी (२५ सप्टेंबर) प्रति १० ग्रॅम सोन्याचे दर ४७,१४० रुपये इतका आहे. तर चांदीचे (Silver) दर किलोमागे ६२,२१० रुपये इतका आहे.