जळगाव जिल्हाजळगाव शहर
साहेब, जरा जपून बोला.. महापौरांनी केली कानउघडणी
जळगाव लाईव्ह न्युज | २४ सप्टेंबर २०२१ | रावलानी साहेब महिलांची बोलताना जरा जपून बोलत जा अशा शब्दात महापौर जयश्री महाजन यांनी रावलानी यांची कान उघाडणी केली.
महानगरपालिकेचे मुख्य वैद्यकीय अधिकारी राम रावलाणी यांनी आशा वर्कर यांना माझ्या बाबत कोणालाही तक्रार केल्यास तुम्हाला कामावरून काढून टाकण्यात येईल अशा भाषेत आशा वर्कर्स यांना धमकीवजा इशारा दिला होता. ही बाब अशावर्कर्स यांनी आज महापौरांसमोर आणली. यावेळी महापौरांनी महिलांसोबत बोलताना जरा नीट बोलत जा अशा शब्दात राम रावलाणी यांची कानऊघडणी केली.
याच बरोबर महापौर पुढे असेही म्हणाल्या की, तुमच्या बाबतीत माझ्याकडे अनेक तक्रारी येत असतात या तक्रारी येऊ नये त्याच्याकडे आपलं लक्ष हव. यावेळी उपमहापौर उपस्थित होते.