गुन्हेजळगाव जिल्हा
टँकरची दुचाकीला धडक, दोघे जखमी
जळगाव लाईव्ह न्यूज । २४ सप्टेंबर २०२१ । शहरातील महामार्गावर आहुजा नगरजवळ शुक्रवारी दुपारी ११ वाजेच्या सुमारास झालेल्या अपघातात दोघे जखमी झाले आहे.
आहुजा नगरजवळ इंडियन ऑइलच्या टँकरच्या धडकेत दोन दुचाकीस्वार जखमी झाल्याची घटना आज ११ वाजेच्या सुमारास घडली आहे. दरम्यान, अपघातातील जखमी गंभीर असल्याची माहिती तालुका पोलिसांनी दिली असून टँकर जप्त करण्यात आले आहे. याप्रकरणी अद्याप पोलिसात कोणतीही नोंद करण्यात आलेली नाही.