⁠ 
सोमवार, एप्रिल 22, 2024

जळगावकरांनो काळजी घ्या : शहरात सुरु आहेत या ४ साथी

जळगाव लाईव्ह न्यूज । २७ फेब्रुवारी २०२३ । जळगाव शहरातल खासगी दवाखान्यांमध्ये बालकांना उपचारासाठी घेऊन जाणाऱ्या पालकांची गर्दी वाढत आहे. तपासणीत १० पैकी आठ मुलांना सर्दी, खोकला, ताप, डोळे येणे, अंगदुखी आदी लक्षणे आढळून येत आहेत.

यात गोवर, फ्लू, राहेनो, ऑडनो व्हायरसची लागण असू शकते; मात्र उपचाराअंती सर्वजण बरे होत आहेत. पालकांनी उपचार व योग्य खबरदारी घेतल्यास विषाणूपासून बचाव होण्यास मदत होते, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

अॅडिनो, इन्फ्लुएंझा, राहेनोसारख्या विषाणूंमुळे मुलांना आजार वेदनादायी ठरत आहेत. पाच वर्षांची बालके जास्त बाधित होत आहेत. लसीकरण झालेल्यांना विषाणूपासून कमी त्रास होताना दिसत आहे. यात

सध्या शाळांमध्ये स्नेहसंमेलने सुरू आहेत. तसेच पालकांबरोबर मुले गर्दीत गेल्यामुळे एकमेकांच्या संपर्कात येतात. त्यामुळे आजार पसरत आहेत. बरीच मुले दोन ते तीनवेळा आजार पडतात. ते वेगवेगळ्या विषाणूचा संपर्कात आल्यामुळे होत आहे. त्यामुळे जी मुले आजारी आहेत, त्यांना शाळेत पाठवू नये, असा सल्ला बालरोग तज्ज्ञांनी पालकांना दिला आहे.