महावेध पोर्टलवर हवामानाची माहिती उपलब्ध

सप्टेंबर 22, 2021 7:32 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । २२ सप्टेंबर २०२१ ।  राज्यात महसूल मंडळस्तरावर स्वयंचलित हवामान केंद्राची उभारणी करणे व हवामान घटकांची आकडेवारी संकलनासाठी स्कायमेट वेदर सर्व्हिसेस व राज्य शासनाच्या सार्वजनिक- खासगी भागीदारीतून महावेध प्रकल्प राबविण्यात येत आहे. या प्रकल्पांतर्गत सद्य:स्थितीत उभारलेल्या २१०८ केंद्रातून तापमान, पर्जन्यमान साक्षेप आर्द्रता, वाऱ्याचा वेग आणि दिशा या हवामान घटकांच्या Real Time माहितीची नोंद होत आहे.

Collector-Office-Jalgaon

या प्रकल्पांतर्गत स्वयंचलित हवामान केंद्राव्दारे नोंदविलेली केंद्र स्थापनेपासून आज घडीला ३६५ दिवसांपूर्वीची कमाल व किमान तापमान सकाळी ८.३० वा व सायंकाळी ५.३० वाजेची सापेक्ष आर्द्रता, वाऱ्याचा झोत व पर्जन्यमान या हवामान घटकांची दैनंदिन माहिती महावेध पोर्टलवर उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. सदरची माहिती https://servicemahavedh.com/mahavedh.portal/ या संकेतस्थळावर Historical data या शीर्षकाखाली जिल्हा, तालुका, मंडळ व 30 दिवसांचा अपेक्षित कालावधी निवडून पाहता येईल, असे मुख्य सांख्यिकी, कृषी आयुक्तालय, पुणे यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकान्वये कळविले आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now