---Advertisement---
जळगाव जिल्हा

इंडियन रेडक्रॉस सोसायटीतर्फे लहान मुले, गर्भवती महिलांना औषधी वाटप

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । १८ सप्टेंबर २०२१ । इंडियन रेडक्रॉस सोसायटीच्या आपत्ती व्यवस्थापन समिती आणि रेडक्रॉस मेडीसीन बँक या उपक्रमा अंतर्गत समतानगर भागातील गर्भवती महिला आणि लहान बालकांना औषधींचे वाटप करण्यात आले.

Untitled design 62 jpg webp

याप्रसंगी रेडक्रॉसचे उपाध्यक्ष गनी मेमन, मानद सचिव विनोद बियाणी, रक्तकेंद्र चेअरमन डॉ. प्रसन्नकुमार रेदासनी, आपत्ती व्यवस्थापन समिती चेअरमन सुभाष सांखला, रक्तकेंद्र सचिव डॉ.अपर्णा मकासरे, कार्यकारिणी सदस्य अनिल शिरसाळे, धर्मार्ध दवाखान्यातील वैद्यकीय अधिकारी डॉ. वासुदेव मावळे, डॉ. जयप्रकाश खडसे, जनसंपर्क अधिकारी उज्वला वर्मा, माजी नगरसेवक नितीन बरडे, आनंदघर उपक्रमाचे संस्थापक अद्वैत दंडवते आणि प्रणाली शिसोदिया आदी उपस्थित होते.

---Advertisement---

राज्य शाखा मुंबई यांच्या सहकार्याने व भारतातील रॅपटाकोस ब्रेट अँड कंपनी, मुंबई या फार्मास्युटीकल कंपनीच्या मदतीने रेडक्रॉस जळगाव शाखेला अनेक प्रकारची रोगप्रतिकार शक्ती वाढविणारी औषधी, भूक वाढीसाठीची औषधी, रक्तवाढीची औषधी, गर्भवती महिलांना प्रोटीन पावडर, अशी औषधी प्राप्त झाली आहे. ही औषधी गरजू व्यक्तींना मिळावी यासाठी रेडक्रॉस मेडिसिन बँक हा उपक्रम सुरु करण्यात आला असून संबंधित भागात जाऊन औषधी वितरणाचे काम हाती घेण्यात आले. या अंतर्गत शहरातील समतानगर भागात अद्वैत दंडवते आणि प्रणाली शिसोदिया यांच्या मार्फत आनंदघर हा उपक्रम नियमित स्वरुपात चालविला जातो. यात कचरा वेचणाऱ्या मुलांना शिक्षण लहान बालकांचे तसेच गर्भवती महिलांचे आरोग्य चांगले राहावे यासाठी विविध उपक्रम राबविले जातात. या आनंद घरातील १२५ बालकांना व गर्भवती महिलांना डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधी देण्यात आली. हा उपक्रम भविष्यात हि असाच सुरु राहील असे मनोगत रेडक्रॉसचे मानद सचिव विनोद बियाणी यांनी व्यक्त केले.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---