वर्ल्ड बुक रेकॉर्ड मध्ये अमित जगताप यांची नोंद
जळगाव लाईव्ह न्यूज । १८ सप्टेंबर २०२१ । कोरोना कालखंडातील वृक्ष संवर्धन तसेच गरजू लोकांपर्यंत अन्नधान्य स्वरूपात मदतीबद्दल वर्ल्ड बुक रेकॉर्ड मध्ये नोंद ग्रीन फाऊंडेशन, महाराष्ट्र राज्य च्या वतीने गेली पाच वर्ष निसर्ग कार्य चालू आहे. तसेच वृक्षारोपण सोबत वृक्षसंवर्धन वर जास्त भर देण्यात येत आहे. ग्रीन फाऊंडेशन 29 जिल्हात कार्यरत आहे, ग्रीन फाऊंडेशन चा महत्त्वाचा हेतू संपूर्ण भारतात पोहचून हरित भारत करण्याचे स्वप्न सत्यात उतरवण्याचे काम ग्रीन फाऊंडेशन संस्थापक अध्यक्ष अमित जगताप करत आहेत.
वर्ल्ड बुक रेकॉर्ड मध्ये नोंद झाल्याबद्दल महाराष्ट्र राज्य मधील त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या असंख्य चाहत्यांनी त्यांचे अभिनंदन केले. असून विशेष अभिनंदन शिरूर हवेली आमदार अशोक बापू पवार, हवेली चे ज्येष्ठ नेते माधवआण्णा काळभोर, उद्योजक अनिषशेठ काळभोर, साधना सहकारी बँक मा.व्हा.चेअरमन बाळासाहेब कोळपे,उपसभापती युगंधर सनीशेठ काळभोर ,लोणी काळभोर सरपंच राजाराम बापू काळभोर, उपसरपंच ज्योती काळभोर वनव्यवस्थापन समिती अध्यक्ष युवराज काळभोर अनेकांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. त्यांच्या यशाबद्दल ग्रीन फाउंडेशन महाराष्ट्र राज्य तर्फे अभिनंदन.
ग्रीन फाऊंडेशन च्या माध्यमातून वृक्ष संवर्धन, वृक्षारोपण, रक्तदान शिबीर, शालेय साहित्य वाटप,अन्नधान्य स्वरूपात मदत, उन्हाळ्यात पक्ष्यांना धान्य पाणी उपक्रम, बेटी बचाओ बेटी पढावो अभियान,झाडे लावा झाडे जगवा जनजागृती , अशा बहुतांश उपक्रम ग्रीन फाउंडेशन राबवत आहेत. ग्रीन फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष अमित जगताप यांच्या कार्याची दखल घेत लंडन येथील वर्ल्ड बुक रेकॉर्ड चे बेल्हेल्म जेझलर- युरोप स्वित्झर्लंड प्रमुख तसेच महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष मेहबूब सय्यद यांनी जाहीर केले . हा गौरव केवळ माझा एकट्याचा नसून महाराष्ट्रातील 29 जिल्ह्यातील प्रत्येक पदअधिकारी- सभासद तसेच लोणी काळभोर गावाचा आहे .हा सन्मान ग्रीन फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य तसेच लोणी काळभोर यांस समर्पित करीत आहे असे वक्तव्य अमित जगताप यांनी वेळी केले.