नात्याला काळिमा फासणारी घटना : हातपाय बांधून आतेभावानेच केला अत्याचार, अल्पवयीन मुलगी गर्भवती

सप्टेंबर 17, 2021 2:11 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । १७ सप्टेंबर २०२१ । जळगाव लाईव्ह न्यूज । १७ सप्टेंबर २०२१ । नात्याला काळिमा फासणारी एक धक्कादायक घटना जळगाव तालुक्यात घडली आहे. आतेभावानेच केला १४ वर्षीय मुलीचे हातपाय बांधून तिच्यावर अत्याचार केले. त्यात ही मुलगी गर्भवती झाली आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी गुरुवारी संशयित तरुणाला अटक केली आहे. घटना मे-जून २०२१ दरम्यान घडली आहे.

crime

एके दिवशी पीडितेचे आई, वडील शेतात गेलेले असताना गावातच राहणारा पीडितेचा आतेभाऊ दुपारी घरी आला. तोंडाला रुमाल व साडीने हातपाय बांधून त्याने पीडितेवर अत्याचार केला. या घटनेची कुठे वाच्यता केली तर मारुन टाकण्याची धमकी दिली. त्यामुळे पीडितेने भीतीपोटी कोणालाच सांगितले नाही. आता गेल्या आठ दिवसांपासून उलट्यांचा त्रास होत असल्याने गुरुवारी आईने जिल्हा रुग्णालयात मुलीला उपचारासाठी आणले असता ती गर्भवती असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

हे ऐकून आईला जबर धक्का बसला. याबाबत तिला आईने विश्वासात घेऊन विचारणा केली असता मुलीने झाल्या प्रकाराची माहिती दिली. या घटनेनंतर महिलेने पती व मुलीला घेऊन एमआयडीसी पोलीस ठाणे गाठून संपूर्ण घटनाक्रम सांगितला. पोलीस निरीक्षक प्रताप शिकारे यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेता तक्रारीची वाच्यता न होऊ देता तातडीने संशयिताच्या अटकेसाठी पथक रवाना केले. म्हसावद दूरक्षेत्राचे हवालदार बळीराम सपकाळे, स्वप्नील, पाटील, प्रदीप पाटील, हेमंत पाटील व होमगार्ड नितीन चिंचोरे यांच्या पथकाने त्याला सायंकाळी एका गावातून ताब्यात घेतले. रात्री आठ वाजता त्याला अटक करण्यात आली. पीडितेच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल झाला आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now