विहीरीत पडून बोढरे येथील १७ वर्षीय तरूणाचा मृत्यू

सप्टेंबर 16, 2021 6:02 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । १६ सप्टेंबर २०२१ । चाळीसगाव तालुक्यातील बोढरे येथील १७ वर्षीय तरूणाचा विहीरीच्या पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. ही घटना आज गुरुवारी दुपारी घडली आहे. अनिल शिवाजी राठोड (वय-१७) असे मृत तरुणाचे नाव असून या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

succied jpg webp

याबाबत असे की, बोढरे येथील अनिल राठोड याच्या घरची परिस्थिती हलाखीची असून आई-वडील ऊसतोडीणीचे कामे करून कुटुंबाचे उदरनिर्वाह करीत आहेत. दरम्यान, अनिल याचा आज दुपारी गावालगतच्या शिवारातील एकाच्या विहीरीच्या पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना उघडकीला आली आहे.

या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा करण्यात आला. अनिल राठोड याच्या मृतदेहाला शवविच्छेदनासाठी चाळीसगाव ग्रामीण रूग्णालयात नेण्यात आले आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now