काडतूस, पिस्तुलासह दोघांना चाळीसगाव शहर पोलीसांनी घेतले ताब्यात

सप्टेंबर 15, 2021 9:26 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । १५ सप्टेंबर २०२१ । चाळीसगाव तालुक्यातील खरजई येथील 23 वर्षीय तरुणाकडून चाळीसगाव शहर पोलीसांनी केलेेल्या कारवाईत गावठी बनावटीचे पिस्तुल व एक जीवंत काडतूस जप्त केले. आज बुधवार दुपारी सव्वा तीन वाजता ही कारवाई करण्यात आली. या प्रकरणी खरजईच्या तरुणासह ज्यांच्याकडून हे पिस्तोल विकत घेतले ते दोघे अशा तिघांच्या विरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे   तर दोघांना अटक करण्यात आली आहे.

chalisagaon 2

या घटनेची माहिती अशी की, तालुक्यातील खरजई येथील तरुणांकडे पिस्तुल असल्याची गोपानीय माहिती चाळीसगाव शहर पोलीस ठाण्याचे  पोलीस निरीक्षक कांतीलाल पाटील यांना मिळाल्यावरून त्यांच्या मार्गदर्शनाखाली दि 15 रोजी दुपारी 3-15 वाजेच्या सुमारास  सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक बिरारी यांच्यासह   पोकॉ.अमोल पाटील, पोना. दिपक पाटील, अमोल भोसले, निलेश पाटील, अशोक मोरे, गणेश कुवर, शरद पाटील यांनी खरजई येथे मोरया कृषी केंद्राजवळ संशयित रित्या उभा असलेल्या दीपक गणेश एरंडे (वय 23) रा. खरजई ता. चाळीसगाव याची चौकशी करून झडती घेतली असता त्याच्या जवळ कमरेस पँटच्या आतील बाजुस एक गावठी बनावटीचे पिस्टल खोचलेले मिळुन आले.

या पिस्तुलाची किंमत 20 हजार रूपये इतकी  पोलीसांनी पितळी आवरण व समोरील बाजूस तांब्याची पॉइंट असलेले जीवंत काडतूसही ताब्यात घेतले. त्यास पोलीसी खाक्या दाखवताच त्याने सदर पिस्तुल व राऊंड पवन उर्फ अविनाश रमेश चव्हाण रा. रामवाडी, चाळीसगाव व भुषण रतन नवगिरे रा. रिंगरोड, पाटीलवाडा, चाळीसगाव यांचेकडुन 30 हजार रूपयात विकत घेतल्याची कबुली दिली.

पोलिसांनी  भूषण रतन नवगिरे रा. रिंगरोड, पाटीलवाडा, चाळीसगाव यास पण अटक करून दीपक गणेश एरंडे रा. खरजई व ते पिस्तुल विक्री करणाऱ्या पवन उर्फ अविनाश रमेश चव्हाण रा.. रामवाडी, चाळीसगाव व भूषण रतन नवगिरे रा. रिंगरोड, पाटीलवाडा, चाळीसगाव यांच्या विरोधात भारतीय हत्यार कायदा कलम 3/25, 7/25 व महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 37 (1), (3) व 135 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक बिरारी हे करीत आहेत.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now