जळगाव जिल्हा
Breaking : ९ नगरसेवक शिवसेनेच्या संपर्कात
जळगाव लाईव्ह न्यूज । ५ सप्टेंबर २०२१ । जळगाव मनपा तील आणखी काही नगरसेवक शिवसेनेच्या संपर्कात असून निधी वाटप करताना विरोधकांना निखील निधी दिल्यास त्याचा फायदा होऊ शकेल, असा विश्वास बंडखोर नगरसेवकांनी शिवसेना संपर्क प्रमुख संजय सावंत यांच्याकडे व्यक्त केला.
अजिंठा विश्रामगृहात झालेल्या बैठकीत ते बोलत होते. बंडखोर नगरसेवकांनी सांगितले की, शिवसेनेत येण्यास आणखी आठ ते नऊ नगरसेवक येण्यास उत्सुक आहेत. निधीचा वाटप करताना प्रत्येक नगरसेवकाला योग्य तो सन्मान देण्यात यावा जेणेकरून शिवसेनेत येणाऱ्या नगरसेवकांची संख्या वाढेल, असे ते म्हणाले.
याबाबत संजय सावंत यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी याविषयी कोणतीही प्रतिक्रिया देणे ही घाई होईल यामुळे योग्य वेळी याबाबत प्रतिक्रिया देईन असे सांगितले.