अबबब….जळगावच्या व्यावसायिक महिलेला लावला तब्बल ९४ लाखाचा चुना

सप्टेंबर 5, 2021 5:10 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । ५ सप्टेंबर २०२१ । फसवणुकीच्या घटनेत दिवसेंदिवस वाढ होतानाचे दिसून येत आहे. जळगावातील एका व्यवसायिक महिलेला निती आयोगाचे बनावट कागदपत्रे दाखवून प्रशिक्षण केंद्र सुरू करण्याच्या नावाखाली तब्बल ९४ लाख १४ हजार ८५३ रूपयाचा चुना लावला आहे.   याप्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात दहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत असे की, शहरातील पिंप्राळा भागात राहणाऱ्या महिला व्यावसायिक योगीता उमेश मालवी (वय-३८) ह्या खासगी व्यवसाय करून आपल्या कुटुंबियांचा उदरनिर्वाह करतात. व्यवसाय करत असल्याने त्यांची अविनाश अर्जून कडमकर रा. देहठेणे ता. पारनेर जि. नगर यांच्याशी डिसेंबर २०१८ मध्ये ओळख झाली. कडमकर यांनी योगीत मालवी यांना निती आयोगाचे बनावट कागदपत्र दाखवून व बनावट नोंदणी प्रमाणपत्र दाखविले. प्रशिक्षण केंद्र चालविण्याचे आमिष दाखविले. त्यानुसार मालवी यांना बनावट खाते क्रमांक पाठविले.

अविनाश अर्जून कडमकर, प्रिती विनायक खवले, प्रमिला अर्जून कडमकर, कांचन दादाभाऊ दंगे, शिवराम आप्पाजी जासूद, संगिता शिवराम जासूद, अर्जून माधवराव सर्व रा. देहठेणे ता. पारनेर जि. नगर यांनी प्रशिक्षण केंद्र चालविण्याचे आमिष दाखवून योगीता मालवी यांच्याकडून वेळोवेळी १५ जानेवारीपर्यंत बनावट खात्यावर सुमारे ९४ लाख १४ हजार ८५३ रूपये मागवून घेतले. दरम्यान आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर योगीत मालवी यांनी शनिवारी ४ सप्टेंबर रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास रामानंद नगर पोलीसात धाव घेवून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून रामानंद नगर पोलीस ठाण्यात वरील सात जणांसह इतर अनोळखी ३ जण असे एकुण १० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोउनि संदीप पाटील करीत आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now